आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Ask 3 Former PM Son In Law To Give Details Of Foreign Trips

VVIP जावयांना द्यावी लागणार परदेश दौ-याची माहिती, दिल्‍ली पोलिसांनी पाठवली पत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राबर्ट वढेरा-प्रियंका गांधी
नवी दिल्ली - देशातील टॉप व्हीव्हीआयपींना आता त्यांच्या परदेश दौ-यांची माहिती सरकारला द्यावी लागेल. त्यामध्ये तीन माजी पंतप्रधानांच्या जावयांचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी या व्हीव्हीआयपींना मागितलेल्या माहितीमध्ये ते केव्हा व कुठे जाणार आहेत, किती दिवस राहतील, कोणाला भेटतील आणि का जात आहेत, दौरा व्यावसायिक आहे, खासगी आहे की सरकारी याचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिसांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी, मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या जावयांबरोबरच माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांनाही त्यांच्या परदेश दौ-यांची माहिती द्यावी लागणार आहे. या सर्व व्हीव्हीआयपींना त्यांच्या परदेश दौ-याची पूर्वसूचना सरकारला द्यावी लागेल. परदेशी कोणी तरी बोलावल्याने जात आहेत की, खासगी यात्रेवर आणि जर कोणी तरी बोलावल्यामुळे जात असतील तर कोणाच्या बोलावण्यावर जात आहेत, आणि कुठे राहणार आहेत हे सांगावे लागणार आहे.

यांना पाठवण्यात आली पत्रे
दिल्ली पोलिसांनी हे पत्र प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि त्यांच्या सासू मॉरीन वढेरा यांच्यासह अटल बिहारी वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य, नात निहारिका आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जावई आयपीएस अशोक पटनायक आणि त्यांचा मुलगा रोहन पटनायक तसेच प्रोफेसर विजय तनखा आणि त्यांची मुले माधव आणि राधव तनखा यांनाही पाठवले आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार या व्हीव्हीआयपींना अशा प्रकारचे पत्र पाठवण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

प्रथमच मागवली अशी माहिती
पंतप्रधानांच्या नातेवाईकांकडून अशा प्रकारची माहिती मागवण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्रिय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की परदेशात व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी ही पावले उचलण्यात येत आहे. 2002 पासूनच यादिशेने प्रयत्न सुरू होते. पण यावर्षी त्यावर अंमलबजावणी केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. व्हीव्हीआयपींच्या परदेश दौ-याची माहिती नसल्याने अनेकदा सुरक्षेचा प्रश्न उभा राहत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

पंधरा दिवसांपेक्षा अधिक दौरा असल्यास सुरक्षेचा खर्च द्यावा लागणार
ज्या 10 व्हीव्हीआयपींच्या परदेश दौ-यांविषयी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे, त्यांच्या दौ-याच्यावेळी सरकार सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करणार आहे. पण दौरा वैयक्तीक आणि 15 दिवसांपेक्षा अधिक असल्यास सुरक्षेचा संपूर्ण खर्च बोलावणारी संस्था आणि व्हीआयपी यांना उचलावा लागेल.

पुढील छायाचित्रांत पाहा, अटल आणि मनमोहन सिंग यांच्या जावयांची मागणी