आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये लॉ फर्मच्या ऑफिसमधून 13 कोटी जप्त, 2.5 कोटींपेक्षा अधिक नव्या नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या ग्रेटर कैलास परिसरात गुन्हे शाखेने सोमवारी पहाटे एका लॉ कंपनीवर धाड टाकली. येथे 13 कोटींपेक्षा अधिकच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कंपनीचे नाव टीअँडटी लॉ फर्म आहे. क्राइम ब्रँचचे अधिक्षक संजय सेहरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या पैशामध्ये अडीच कोटींपेक्षा अधिक नव्या नोटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

तिजोरीत भरून ठेवले होते पैसे..
- रिपोर्ट्सनुसार ज्यावेळी पोलिसांनी ऑफिसवर छापा टाकला त्यावेळी ऑफिसमधील खोल्या बंद होत्या.
- रेडच्या वेळी कंपनीचा केयरटेकर त्याठिकाणी उपस्थित होता. पोलिस सध्या कंपनीच्या मालकांचा शोध घेत आहेत.
- रेडमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांच्या नव्या नोटा आणि इतर कॅश 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांची होती.
- खोल्यांच्या तिजोऱ्यांमध्ये पैसे कोंबून ठेवले असल्याचे पाहायला मिळाले.

कर्नाटकात हवाला व्यापाऱ्याच्या बाथरूममध्ये सापडले होते 6 कोटी
- इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शनिवारी कर्नाटकातील एक हवाला व्यापारी यांच्या चित्रदुर्ग आणि हुबळी येथील घरींवर छापे टाकले.
- चित्रदुर्गजवळच्या चल्लाकेरे येथील घरातून 5.7 कोटींच्या 2000 च्या नव्या नोटा तर 90 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या.
- त्याशिवाय सोन्याचे 32 किलोचे दागिनेही मिळाले.
- चेन्नईचे वाळू व्यावसायिक शेखर रेड्डी यांच्या वेल्लोर येथील घरातूनही 24 कोची जप्त करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...