आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police File Chargesheet In IPL Spot Fixing Case

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपप‍त्र दाखल; कव्हर पेजवर दाऊद, शिल्पा बनली साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सहा हजार पानांच्या आरोपपत्रात दिल्‍ली पोलिसांनी अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला आरोपी बनवले आहे. विशेष म्हणजे या आरोपपत्राच्या कव्हर पेजवर दाउदचे छायाचित्रंही लावण्यात आले आहे.

राजस्थान रायॅल्सचा क्रिकेटर एस.श्रीसंत, अजित चंदीला, अंकित चव्‍हाण या तिघांसह एकून 39 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. सर्व आरोपींविरूद्ध पोलिसांनी मोक्का कायदा आणि भादंवि कलम 420 नुसार फसवणूक, कलम 120 नुसार गुन्ह्याचे षडयंत्र रचण्याचे आरोप लावले आहे.

आरोपपत्रमध्ये ठपका ठेवण्यात आलेल्या 39 आरोपींपैकी दस आरोपी अद्याप फरार आहेत. तर 21 आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे तर आठ आरोपी तुरूंगाची हवा खात आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाउदच्या इशार्‍यावरून क्रिकेटमध्ये फिक्सिंग केली जाते. तसेच त्यांने सांगितल्यानंतर सट्टेबाजीचे 'रेट' ठरवले जात असल्याचे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.