आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारने वेगमर्यादा ओलांडली; पाठलाग करून उपमुख्यमंत्र्यांना ठोठावला दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कारला दिल्लीच्या वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला आहे. दिल्लीच्या खजुरी खास चौकात 12 जूनला सिसोदिया यांची कार मर्यादेपेक्षा अधिक वेगात जात होती त्यामुळे त्यांना 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्र्यांची कार चौकातून अत्यंत वेगात जात होती. त्यावेळी पोलिसांनी ड्रायव्हरला थांबण्यासाठी इशारा केला होता. पण ड्रायव्हरवने कार थांबवली नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सुमारे तासभर कारचा पाठलाग करून दंड केला. सिसोदिया यांची कार जेव्हा वाहतूक पोलिसाने थांबवली त्यावेळी ते कारमध्येच बसलेले होते, तर त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता.

लोकांनी आक्षेप घेतल्याने केली कारवाई
हा प्रकार घडला त्यादिवशी खास चौकावर चेकिंग सुरू होती. त्यावेळी त्याठिकाणी अनेक लोकांवर कारवाई केली जात होती आणि लोक दंडही भरत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्र्यांची कार वेगात त्याठिकाणाहून निघून गेली. त्यावेळी त्याठिकाणी उभे असलेले इतर लोक (ज्यांच्यावर कारवाई केली जात होती ) चांगलेच नाराज झाले. त्यांनी पोलिसांना या व्हिआयपी कारवरही कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर तीन वेळा सिसोदिया यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण गाडी थांबली नाह, असे सुत्रांनी सांगितले आहे. सुमारे एक तास पाठलाग केल्यानंतर गाडी थांबवण्यात आली आणि दंड ठोठावण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारच्या ड्रायव्हरने अरेरावी करण्याचा प्रयत्नही केला होता.