आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पोलिस आणि भारती यांच्यामध्ये लपंडाव, भारती देताहेत हुलकावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली; दिल्लीचे माजी कायदामंत्री आणि आम आदमी पार्टीचे आमदार सोमनाथ भारती आणि दिल्ली पोलिसांमध्ये मागील काही दिवसांपासून लंपडावाचा खेळ सुरू आहे. वीसहून अधिक पोलिसांचे धाडसत्र आणि दक्षिण पश्चिम जिल्हा पोलिस शर्थीचे प्रयत्न करूनही ते भारती यांना पकडू शकले नाहीत.

दिल्ली पोलिसांना सराईत गुन्हेगारांप्रमाणे हुलकावणी देणारे भारती आणि त्यांच्या सोबतचे अर्धा डझन लोक आपले लोकेशन पोलिसांना कळू नये म्हणून मोबाईल फोनचा वापरच बंद केला आहे. शुक्रवारी सकाळी भारती यांच्या एका सहकाऱ्याच्या मोबाईलचे लोकेशन पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील काही गावांमध्ये पोलिसांना मिळाले होते. त्यानंतर एकही मोबाईल फोन चालू स्थितीत आढळून आलेला नाही. सोमनाथ भारती आणि त्यांना मदत करणारे त्यांचे सहकारी नवीन मोबाईलसह सतत नवनवीन सीमकार्डचा वापर करून करीत आहेत.त्याद्वारे ते अधून-मधून आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्क साधत आहेत. पोलिस या मोबाईलचा आयएमईआय नंबर आणि नवीन मोबाईलचा नंबरचा शोध घेण्यासाठी भारतीसहीत इतर सहकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.तसेच त्या भागात खरेदी केलेले आणि शुक्रवारी सकाळी अॅक्टीव्ह झालेले मोबाईल फोन आणि नंबरचाही पोलिसांनी शोध घेणे सुरू केले आहे. भारती हे माजी कायदामंत्री आणि आमदार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दोनदा पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्यांच्या वास्तव्याविषयी माहिती देण्याची विनंती करण्यात आली होती. पोलिसांकडून भारती यांच्या कुटुंबीयांना आदराची वागणूक मिळत असताना भारती मात्र सराईत गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांना हुलकावणीत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी भारती यांचे कुटुंबीय व जवळच्या व्यक्तींची विचारपूस करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपच्या जिल्हाध्यक्षावर लैगिंक शोषणाचा आरोप
सोमनाथ भारती फरार झाल्याने आम आदमी पार्टीची बदनामी होत असतानाच आपचे मुख्यालय असलेल्या पटेल नगर भागाचे जिल्हाध्यक्ष दीपक चौहान यांच्यावर एका २८ वर्षीय युवतींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. युवतीच्या तक्रारीवरून पटेलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान,जिल्हाध्यक्षाच्या बचावासाठी आपचे अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला असून, आरोप करणाऱ्या युवतीचे आरोपी नेत्यासोबत लग्न झाले असून, त्यासंबंधीचा पुरावा पक्षाकडे उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी पीडित युवतीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पटेनगर भागाचे जिल्हाध्यक्ष दीपक चौहान यांनी लग्नाचे आमिष दाखवून आपले शारीरिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

तथ्य समोर येईल
युवतीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. पीडित युवती आणि आरोपी दोघांनी दिलेल्या बयाणाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. लवकरच तथ्य समोर येईल.
परमादित्य,डीसीपी,मध्‍य जिल्‍हा,नवी दिल्ली.