आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Issues Alert About A Car Missing From Pathankot

पठाणकोटहून दिल्लीकडे येणारी कार बेपत्ता, ड्रायव्हरचा मृतदेह सापडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोटहून दिल्लीला येणारी एक अल्टो कार बेपत्ता झाली आहे. अशी माहिती आहे, की कार किरायाने घेण्यात आली होती, मात्र कार ड्रायव्हरचा मृतदेह सापडला आहे. ही महिती मिळाल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त काय म्हणाले
- दिल्ली पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी म्हणाले, सुरक्षेच्या मुद्यावर बोलणार नाही मात्र, दिल्लीकरांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.
- मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेली कार पांढऱ्या रंगाची असून तिचा क्रमांक HP 01D 2440 आहे.
- हिमाचलच्या कांगडा येथे ड्रायव्हरचा मृतदेह सापडला.
- प्राप्त माहितीनुसार, तीन जणांनी कार किरायाने घेतली होती. रस्त्यात त्यांनी ड्रायव्हरचा खून केला आणि कार घेऊन फरार झाले.
- दोन जानेवारी रोजी पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता.
- हल्ला केलेल्या दहशतवाद्यांनीही एका गाडीच्या ड्रायव्हरची हत्या केली होती आणि गाडी घेऊन फरार झाले होते