आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Launches 'Himmat' Android App For The Safety Of Women

दिल्ली पोलिसांकडून महिलांना ‘हिंमत’, सुरक्षेसाठी स्मार्टफोन अ‍ॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर दिल्ली पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संकटात असलेल्या महिलांना अ‍ॅपच्या साहाय्याने मदत देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दिल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी "हिंमत' नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचे लाँचिंग करण्यात आले. या वेळी गृहमंत्री यांच्या हस्ते तरुणींना मिरची स्प्रेदेखील भेट म्हणून देण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या या नवीन अ‍ॅपला गृहखात्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हे अ‍ॅप महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी व्यक्त केला आहे.

बटण महत्त्वाचे
अ‍ॅपमध्येविशिष्ट बटण आहे. ते विशिष्ट वेळ दाबून ठेवावे लागते. त्यानंतर पोलिसांना घटनेची सूचना मिळते. त्या काळात युजर ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगही करू शकतो. छेडछाडीच्या प्रकरणात हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

वेगवान हेच वैशिष्ट्य
"हिंमत'अ‍ॅपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग. तक्रारकर्ता आणि पोलिस नियंत्रण कक्ष काही सेकंदांत जोडले जाऊ शकतात. त्यानंतर लोकेशन ट्रॅक करून अलर्ट दिला जातो. महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन त्याचे डिझाइन करण्यात आले आहे.