आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Air Indiaची लॉयल्टी स्कीम हॅक: पॉइंट्स डायव्हर्ट करून खरेदी केले 16 लाखांचे तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअर इंडियाच्या पॅसेंजर्स लॉयल्टी स्कीममध्ये हॅक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. एअर लाइन्सच्या विमानाने प्रवास करून रिवॉर्ड पॉइंट्स मिळवणार्‍या प्रवाशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलिसांचा सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे.

मिळालेली माहिती अशी की, भामट्यांनी 20 बनावट ईमेल आयडी तयार केले आहेत. एअरलाइन्सच्या एका कर्मचार्‍याच्या मदतीने प्रवाशांचे रिवॉर्ड पॉइंट्स डाइव्हर्ट केले आहेत. चोरलेल्या पॉइंट्सद्वारा 16 लाख रुपयांच्या तिकीट खरेदी केल्याचे समोर आले आहे. नो योर कस्टमर पॉलिसी (Know Your Custmor Policy) नुसार व्हेरिफिकेशनदरम्यान हा गोरखधंदा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांग‍ितले.

व्हिजिलन्स सिस्टिमने पकडले हँकिंग...
- प्रवाशांचा ट्रॅव्हल डाटा व रिडीम करण्यात आलेले रिवॉर्ड पॉइंट्सचा एअर इंडियाच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटने चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.
- हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांचे फ्लाइंग डिटेल्स काढण्यात आली आहे.
- इंग्रजी वृत्तपत्र 'मेल टुडे'च्या अहवालानुसार, जवळपास 20 ईमेल आयडीच्या माध्यमातून प्रवाशांची माहिती हॅक करण्यात आली आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या काही कर्मचार्‍यांवर संशय व्यक्त केला जात आहे.
- फ्रीक्वेंट फ्लायर्सचे पॉइंट्स डायव्हर्ट करून 16 लाख रुपयांचे तिकीट खरेदी करण्‍यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, आतापर्यंत पोलिसांच्या सायबर सेलने काय केला तपास...
बातम्या आणखी आहेत...