आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमर खालीदने सरेंडर करावे, दिल्ली HC चे आदेश; JNU बाहेर BSF-CRPF तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयूमधील घोषणाबाजीच्या वादामध्ये उमर खालीदसह देशद्रोहाचा आरोप असलेल्या पाच विद्यार्थ्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. यूनिव्हर्सिटी कॅम्पसबाहेर दिल्ली पोलिसांसह बीएसएफ-सीआरपीएफच्या तुकड्या तैनात आहेत. मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने उमर खालीद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या प्रोटेक्शनमध्ये सरेंडर करण्याच्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान त्यांना सरेंडर करण्याचे आदेश दिले. तर कन्हैय्या कुमारच्या जामीनावर सुनावणी टळली. पोलिस रिपोर्टमध्ये पाकिस्तान जिंदाबाद घोषणा नाही..
- जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या वादावर दिल्ली पोलिसांनी एक 12 पानांचा अहवाल तयार केला आहे.
- त्यात 29 घोषणांचा उल्लेख आहे. पण ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चा त्यात समावेश नाही.
- कॅम्पसमध्ये 9 फेब्रवारीला रात्री पाकिस्तान जिंदाबादसारख्या देशदविरोधी घोषणा दिल्याचा आरोप काही, विद्यार्थ्यांवर लावण्यात आला आहे.
- हा रिपोर्ट डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस (साऊथ) प्रेमनाथ यांनी सादर केला आहे.
- रिपोर्टमध्ये आयव्हिटनेसचा जबाब आहे. त्यात जेएनयूचे विद्यार्थी आणि स्टाफचा समावेश आहे.
- रिपोर्टनुसार इव्हेंटमध्ये अनेक प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. पण पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या गेल्या नाही.
- दिल्ली पोलिसांनी 12 फेब्रुवारीला ‘झी न्यूज’ च्या फुटेजच्या आधारे एक FIR दाखल केला होता. त्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होत्या.
कन्हैय्याच्या जामीनाला पोलिस करणार विरोध
- हाईकोर्टावे कन्हैय्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना चौकशीचा स्टेटस रिपोर्ट बुधवारपर्यंत सादर करण्यास सांगितला आहे.
- हायकोर्टाने हे निर्देश कन्हैय्याच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान दिले.
- कोर्टासमोर दिल्ली पोलिसांची बाजू मांडताना अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस कन्हैयाला जामीन देण्याचा विरोध करेल.
- मंगळवारी सकाळी साडे 10 वाजता जस्टीस प्रतिभा राणी यांच्या कोर्टात सुनावणी झाली. स्टेटस् रिपोर्टचे काय झाले याची विचारणा जजने केली. रिपोर्ट नसेल तर कार्यवाही करणार नाही, असे न्यायाधीशांनी सांगितले.
- त्यावर बुधवारी बंद लिफाफ्यात रिपोर्ट फाइल करणार अशल्याचे सॉलिसिटर जनरलनी सांगितले. चार्जशीट फाइल होण्यापूर्वी जामीन मिळण्याचे हे प्रकरण आहे. अशा स्थितीत रिपोर्ट आरोपीला दाखवता येत नाही.
- त्याबाबत जज म्हणाले की, रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात नको आहे. तुम्ही उद्यापर्यंत तो फाइल करा आणि नोटीस जारी करा.
-दिल्ली पोलिसांचेच वकील शैलेंद्र बब्बर म्हणाले की, पोलिस कन्हैय्याच्या जामीनाचा विरोध करेल.
- मात्र यापूर्वी पोलिस आयुक्पुत बीएस बस्सी यांनी कन्हैय्याच्या जामीनाला विरोध करणार नसल्याचे म्हटले होते.
- कन्हैय्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, रेबेका जॉन, वृंदा ग्रोवर आणि सुशील बजाज उपस्थित होते. सुनावणी सुमारे 10 मिनिटे चालली.
- बुधवारी कन्हैय्याच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.
जामीन अर्जातील उल्लेख...
- या प्रकरणात गोवले असून आपण देशविरोधी घोषणा दिल्या नसल्याचा दावा कन्हैय्याने केला आहे.
- कोणताही पुरावा नसताना अटक करण्यात आल्याचा दावाही त्याने केला आहे.
- दोन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत डांबण्यात आलेल्या कन्हैय्याने तिहार जेलमध्ये जीवाला धोका असल्याचे सांगत हायकोर्टाकडे जामीन मागितला आहे.
आधी काय दाखवले..
- सुरुवातीला आलेल्या फुटेजमध्ये अँटी नॅशनल, अँटी-कॉन्स्टीटयूट्शनल आणि अँटी गव्हर्नमेंट घोषणा दाखवण्यात आल्या.
- फुटेजमध्ये काही विद्यार्थी 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा देत होते. 11 आणि 12 फेब्रुवारीचे हे फुटेज अनेक चॅनल्सवर दाखवण्यात आले.
- दुसऱ्या व्हिडीओमध्ये जेएनयू प्रेसिडेंट कन्हैया कुमारला अँटी नॅशनल घोषणा देताना दाखवण्यात आले. पण या व्हिडीओबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
- इंडिया टुडे आणि एबीपी न्यूजने त्यांच्या कार्यक्रमात व्हिडीओ फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचे सांगितले होते.
- या चॅनलमध्ये खरा व्हिडीओ कसा होता आणि त्यात कोणत्या घोषणा ऐकू येत होत्या, हेही सांगण्यात आले होते.

पुढे वाचा, उमर खालीदने घेतली होती, माओवादी नेत्याची भेट...