आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Will Question From Shashi Tharoor Within Next 48 Hours, Says Commissioner

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली पोलिसांनी बजावली नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि कॉंग्रेसचे नेते शशी थरुर यांना दिल्ली पोलिसांनी आज (सोमवारी) नोटीस बजावली. थरुर यांना भादंवि कलम 160 नुसार चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी माहिती दिली. त्यामुळे थरुर यांना येत्या 48 तासांमध्ये कोणत्याही क्षणी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
दुसरीकडे, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी देखील दिल्ली पोलिसांची नोटिस मिळाल्याचे सांगितले. तसेच येत्या एक- दोन दिवसांत ते पोलिसांना भेटून त्यांना योग्य ते सहकार्य करणार आहेत. दरम्यान, सुनंदा पुष्कर यांच्या हत्येच्या तपासाने वेग घेतल्याने शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझे अभिनंदन करणे हे कौतुकास्पद होते. आमच्यात वाद झालेला असताना त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे थरूर म्हटले होते.

दरम्यान, दिल्लीतील हॉटेल लीला पॅलेसमध्ये मागील वर्षी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरात इंजेक्शनद्वारे विष सोडण्यात आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी यापूर्वी अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

पुढे वाचा, सुनंदा यांनी स्वतःवर घेतले होते थरूर यांचे आरोप....