आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या तस्कराला पकडताना वरिष्ठ अधिकार्‍यांना घाम फुटायचा, स्पेशल वूमन टीमने केले अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या इतिहासात प्रथमच एका गुन्हेगाराच्या अटकेसाठी फक्त महिला पोलिसांची टीम तयार करण्यात आली होती. कमलेश नावाच्या एका महिला ड्रग्स तस्करला अटक करताना अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना घाम फुटत होता, मात्र शुक्रवारी दिल्ली पोलिसांतील रणरागिण्यांनी हे काम चोख बजावले. कमलेशसह तिचा मुलगा मनदीप आणि मुलगी पूजा यांना अटक करण्यात आली आहे. कमलेशला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यांवर ती थेट हल्ला करत असायची. एकदा तर तिने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यावर हल्ला करत त्यांचे कपडे फाडून टाकले होते.

कशी झाली अटक
कमलेशच्या अटकेसाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये एसीपी नियती मित्तल, पोलिस निरीक्षक मीणा यादव यांच्यासह 25 महिला कॉन्स्टेबल होत्या. महिला पोलिसांची स्पेशल टीम शुक्रवारी पाहाटेच कमलेशच्या घरी पोहोचली आणि तिचा मुलगा व मुलीसह तिला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तिच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमंली पदार्थ आणि त्याची पॅकिंग करण्यासाठीचे साहित्य जप्त केले.
सर्वात शेवटी होते पुरुष पोलिस
दिल्ली दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या उपायुक्तांनी सांगितले, की छापा टाकण्यासाठी पोलिसांचे तीन पथक तयार करण्यात आले होते. पहिल्या दोन तुकड्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या होत्या. शेवटच्या आणि तिसर्‍या तुकडीत एसीपी हर्षवर्धन, एसएसओ हरेंद्र सिंह, एसएचओ विजयपाल सिंह आणि अखिलेश मिश्र यांचे पथक होते.
अत्याधुनिक हत्यारांने सज्ज
कमलेशच्या अटकेसाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती. कारण पूर्वीच्या दोन छाप्यामध्ये कमलेशने पोलिसांवर हल्ला करुन स्वतःची सुटका करुन घेतली होती. त्याने शहाणे होत पोलिस अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. पोलिसांनी एवढी सतर्कता बाळगली होती, की छाप्याच्या आधी कमलेशच्या घराबाहेर एक मोठी लोखंडी भिंत उभी केली होती.

काय म्हणणे आहे पोलिसांचे
वरिष्ठ पोलिस अधिकारी आर.ए. संजीव म्हणाले, महिला ड्रग्स तस्करांवर छापेमारी करताना पोलिसांना मोठी दक्षता बाळगावी लागते. अशा छापेमारीत महिला कायम पोलिसांवर छेडछाड आणि विनयभंगाचा आरोप करतात. स्वतःवर वार करुन घेत पोलिसांवर बळजबरीचा आरोप केला जातो. त्यामुळे यावेळी महिला पोलिस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबलच्या पथकाकडे जबाबदारी देण्यात आली होती. महिला पोलिसांनी यशस्वीरित्या ही कारवाई केली आहे.
बातम्या आणखी आहेत...