आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली पोलिस वकिलाला मारतानाचा VIDEO आला समोर, दोन पोलिस निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत दोन पोलिस एका वकीलाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
पूर्व दिल्लीतील गीता कॉलनीभागातील एका पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिस वकीलाला ढकलत नेतात आणि तो खाली पडतो असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर काही लोक येऊन वकीलाची पोलिसांच्या तावडीतून सुटका करतात. पोलिस वकिलाला का मारहाण करत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दिल्ली पोलिस सध्या चर्चेत आहे. शहरातील एका रेस्तराँमध्ये एका व्यक्तीवर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याला एन्काऊंटर असे नाव देण्यात आले. त्याची चौकशी सध्या सुरु आहे. त्याआधी एका वाहतूक पोलिसांने महिलेला वीटा फेकून मारल्या होत्या. यामुळेही दिल्ली पोलिस चर्चेत आहे.