आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Poll Affidavit Arvind Kejriwal Loses Wealth, Gains Lawsuits

केजरीवालांची संपत्ती घटली पण खटले वाढले, कोट्यधीश उमेदवारांची संख्याही भरपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - केजरीवाल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र. - Divya Marathi
फोटो - केजरीवाल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र.
फोटो - केजरीवाल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी त्यांची संपत्ती घटली आहे. त्यांची एकूण संपत्ती 2 कोटींपेक्षा जास्त आहे. संपत्ती घटली असताना त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या खटल्यांची संख्या वाढून दहा झाली आहे.
यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केजरीवाल यांनी इंदिरापुरममध्ये 57 लाखांचा फ्लॅट असल्याचे सांगितले आहे. तसेच पत्नीच्या नावे 40 लाखांचे कर्ज असल्याचेही सांगितले आहे. केजरीवाल यांच्याकडे केवळ 2.26 लाख रुपये कॅश आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी केजरीवाल यांच्यावर दाखल असलेल्या खटल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांची संख्या वाढून सातहून 10 झाली आहे.

लोकसभा निवडणुकांवेळी होती 2.14 कोटींची संपत्ती
वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी केजरीवाल यांच्याकडे 2 कोटी 14 लाख रुपयांची संपत्ती होती. त्यावेळी त्यांनी गाझियाबादच्या इंदिरापुरम आणि हरियाणाच्या शिवाणीमध्ये दोन फ्लॅट नावावर असल्याची माहिती दिली होती. इंदिरापुरमच्या फ्लॅटची किंमत तेव्हा 55 लाख होती, ती आता कीमत 57 लाख सांगण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता यांच्याकडे गुडगावमध्ये 2244 चौरस फुटांचा फ्लॅट आहे. त्याची किंमत 1 कोटी आहे.

किरण बेदी आणि केजरीवाल यांची तुलनात्मक माहिती

भाजपच्या सीएम कँडीडेट आपचे सीएम कँडीडेट
किरण बेदी (कृष्णानगर)
अरविंद केजरीवाल (नवी दिल्ली )
एकूण जंगम मालमत्ता - 3,14,02,677रु. एकूण जंगम मालमत्ता- 226005रु.
एकूण स्थावर मालमत्ता - 79000000 रु एकूण स्थावर मालमत्ता- 92 लाख रु
गुंतवणूक - बँकेत जमा 23543852 रु. पोस्ट ऑफिसमध्ये (1596985) गुंतवणूक - बँकेत जमा 211005 रु. पत्नीच्या नावावर 36490 चे म्युच्युअल फंड
गाडी - एक कार (मारुती 800) गाडी - एकही नाही
दागिने - 27000 रु. (5 ग्रॅम सोने, कानातील बाळी) दागिने - नऊ लाखांचे सोने, 24000 रुपयांची चांदी.
कर्ज - 6154090 रु. कर्ज - पत्नीच्या नावे 41 लाखांचे लोन
कॅश इन हँड - 55750 कॅश इन हँड - 15000
शेतजमीन - दोन 18500000रु. शेतजमीन- नाही
खटले - एकही नाही. खटले - 10
पुढे वाचा, कोट्यधीश उमेदवारांचा भरणा