आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Election Results: Live Updates Delhi Assembly Election Results 2015

दिल्लीतील या 8 Hot Seat \'आप\'च्या खात्यात; केजरी विजयी तर बेदी, माकन, शर्मिष्ठांचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) भाजपचा 'विजय रथ' रोखला. भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले. हीच भाजपची सगळ्यात मोठी चूक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 67 जागा 'आप'ने काबीज केल्या आहेत. फक्त तीन जागांवर भाजपला यश मिळाले आहे.
दिल्ली विधानसभेतील आठ हॉट सीट्‍सकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आठही जागा 'आप'च्या खात्यात आल्या आहेत.

1. नवी दिल्ली मतदार संघातून 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल विजयी
आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदार संघातून सगळ्यात मोठा विजय प्राप्त केला आहे. केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार किरण वालिया आणि भाजपचे उमेदवार नुपूर शर्मा यांचा पराभव केला आहे. दरम्यान, 2013 मधील निवडणुकीत दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसच्या शीला दीक्षित यांचा 25000 मतांनी पराभव केला होता.

2. कृष्णानगर मतदार संघ- भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांचा पराभव
दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमदेवार असलेल्या किरण बेदी यांचा लाजिरवाना पराभव झाला आहे. भाजपसाठी हा मतदार संघ खूप सुरक्षित आणि महत्त्वाचा होता. तरी देखील भाजपला ही जागा वाचवण्यात अपयश आले आहे. 2013 मध्ये भाजपचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी निवडूक जिंकली होती. यावेळी ही जागा 'आप'च्या खात्यात गेली आहे. 'आप'चे उमेदवार एस. के.बग्गा यांनी किरण बेदी यांचा पराभव केला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या अन्य हॉट सीटविषयी...