आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या नशिबामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त होत असेल तर, दुसर्‍या कमनशिबींची गरज काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून टीका करणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मोदी म्हणाले, माझ्यावर टीका करणारे म्हणतात- पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होत असल्याने मोदी नशीबवान आहेत. मी म्हणतो की, माझ्या नशिबाने पैसै वाचत असतील तर एखाद्या कमनशीब व्यक्तीची काय गरज आहे? माझ्या नशिबाने पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले असेल तर हरकत तरी काय?

दिल्लीच्या द्वारका उपनगरातील प्रचारसभेत मोदींनी आम आदमी पार्टी व काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, खोट्या आश्वासनांनी देश चालत नाही. ही एक गंभीर जबाबदारी असते. दोन्ही (आप व काँग्रेस) सकाळी उठल्यानंतर ठरवतात की आज काय खोटे बोलावे. दिल्लीच्या निवडणुकीवर इतकी खोटारडेपणाची पडछाया यापूर्वी कधीही दिसली नव्हती. भोळाभाबडा चेहरा करून जनतेला फसवले जात आहे. टीव्हीवर झळकण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी सरकार चालवण्याची गरज असते. सर्वसामान्यांच्या वेदना समजून घ्याव्या लागतात. पळपुटेपणाने काम भागत नाही.

मी अस्सल द्वारकेवाला
भाषणाच्या प्रारंभी मोदी म्हणाले की, मी असली द्वारकेवाला आहे, मात्र आता दिल्लीवासी झालो आहे. हरियाणाच्या नव्या सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. इतक्या वर्षांत देशातील गरिबी दूर का झाली नाही? कारण देशात गरिबी हाच राजकारणातील राजमार्ग आहे. तुमचे आयुष्य चांगले व्हावे, याची तसूभरही चिंता या लोकांना नाही.

परतफेड विकासाने
मोदी म्हणाले, मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे. सरकारही त्याच धोरणाने चालवत आहे. विकास हाच सर्व समस्यांवरील इलाज आहे. दिल्लीतील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणारे लोक दिल्लीला हवे आहेत.

दिल्ली २५ वर्षे मागे
पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार स्थापण्याचे आवाहन मोदींनी जनतेला केले. म्हणाले, या वेळी चुकूनही अर्धवट काम करू नका. दिल्लीचे एक वर्ष वाया गेले. दिल्ली २५ वर्षांनी मागे पडलीय. दिल्लीची भरभराट करायची असेल तर पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार आणायला हवे.

मोठे पक्ष एकाच माळेचे मणी, केवळ १९ महिलांना उमेदवारी
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आणि त्यावर देण्यात येणारी आश्वासने दिल्लीच्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे; परंतु प्रत्यक्षात महिला उमेदवार देण्यात मात्र सर्वच मोठ्या राजकीय पक्षांनी कुचराई केल्याचे दिसून येते. भाजप, काँग्रेस आणि आप या सर्वांनी मिळून केवळ १९ महिलांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप या महत्त्वाच्या तीन पक्षांनी ७० सदस्यीय विधानसभेसाठी एकूण १९ महिला उमेदवार दिले आहेत. त्यातही सर्वाधिक महिला उमेदवार देण्याचा मान भाजपला जातो. भाजपच्या आठ महिला मैदानात आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ (पटेलनगर), रेखा गुप्ता (शालिमार बाग), नूपूर शर्मा (नवी दिल्ली), किरण वैद्य (त्रिलोकपुरी), रजनी अब्बी (तिमरपूर), नंदिनी शर्मा (मालवीयनगर), सरिता चौधरी (मेहरौली) यांचा समावेश आहे. त्यानंतर आम आदमी पार्टीचा समावेश आहे.

पुढे वाचा, निवडणूक प्रचार मैदानात काय म्हणाल्या सोनिया गांधी...