आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi Voting : दिल्लीत एकूण 67 टक्के मतदान; किरण बेदींविरोधात तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: नवी दिल्ली विधानसभेच्या भाजपच्या उमेदवार नुपूर शर्मा)

नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत नव्या सरकारच्या निवडीसाठीची मतदानाची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. दिल्लीत एकूण 67 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. 70 जागांसाठी 673 उमेदवार रिंगणात आहेत. 10 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रियांका गांधी आणि त्याचे पती रॉबर्ट वढेरा यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कॉंग्रेसने यापूर्वींही कठीण परिस्थितीचा सामना केला आहे व नेहमी सुखरूप बाहेरही निघाला असल्याचे प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटले. यापूर्वी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल, भाजपच्या उमेदवार किरण बेदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि कॉंग्रेसच्या उमेदवार शर्मिष्ठा यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, नवी दिल्ली विभानसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार नुपूर शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला. नंतर नुपूर शर्मा इंडिया गेडकडे जात असताना 'आप'च्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची छेड काढली. नुपूर शर्मा 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधान निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

कृष्णानगरातील भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांच्या विरोधात 'आप'ने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कृष्णानगर भागातील मतदान केंद्रात किरण बेदी या धावत गेल्या होत्या. तसेच त्यांनी मतदान केल्यानंतर कारच्या टपावर चढून जनतेशी संवाद साधला होता.
किरण बेदी यांनी पदयात्रा काढल्याचे 'आप' आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच मतदानाची प्रक्रिया संथ गतीने व्हावी, यासाठी 'आप' भाजपला जबाबदार ठरवले असून याप्रकाराकडे न‍िवडणूक आयोगाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

VOTING LIVE UPDATE
7.00 PM एकूण 67 टक्के मतदान.
6.00 PM आपला मतदानाचा लाभ झाल्याची एक्झिट पोलची माहिती
5.00 PM 63 टक्के मदतान झाले.
4.00 PM 55.68 टक्के मतदान झाले.
3.30 PM प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वढेरा यांनी मतदान केले.
2.20 PM भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी सायंकाळी पक्षाच्या ज्येष्‍ठ नेत्यांची बैठक बोलावली.
1.00 PM 'आप' हा 'एंटी महिला विरोधी पक्ष' असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवार नुपूर शर्मा यांनी केला आहे.
12.48 PM केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या मेनका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
12.20 AM भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिल्लीतील कृष्णानगर भागातील केंद्रात पळत पोहोचल्या. ही विजयाची शर्यत आहे. यापूर्वी दिल्लीकरांनी पाहिली नव्हती, असे किरण बेदी म्हणाल्या.
11.50 AM देवली विधानसभा मतदार क्षेत्रातील एका केंद्रात एक तासापासून ईव्हीएम नादुरुस्त. शेकडो मतदारांना राहावे लागले रांगेत...
11.26 AM भाजप नेत्या शाजिया इल्मी यांनी 'आप'वर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील करावल नगरात 'आप'च्या कार्यकर्त्यंनी आपल्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचे इल्मी वांनी म्हटले आहे. मात्र, दिल्लीतील जनता कोणासोबत आहे, हे निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
10.35 AM 'आम'चे कार्यकर्ते मतदारांना धमकी देत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी केला आहे. कृष्णनगरातील झोपड्यात राहाणार्‍या नागरिकांनी मीडियाला सांगितले की, शुक्रवारी रात्री 'आप' काही कार्यकर्त्यांनी धमकावले होते. 'आप'च्या उमेदवाराला मत दिले नाही तर झोपड्या तोडून टाकू, असे म्हटले होते.
10.23 AM 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मीडियाला सांगितले की, 'दिल्लीत शुक्रवारी रात्री एका पक्षाने जनतेला मोफत दारु वाटली. लोकांनी अशा पक्षाच्या उमेदवारांना मतदान करू नये.
10.20 AM अरविंद केजरीवाल यांनी केले मतदान
10.05 AM कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्माण भवनात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी किरण वालिया त्यांच्यासोबत होत्या.
9.34 AM गाझियाबादच्या कौशांबी येथे मतदानासाठी पोहोचलेले अरविंद केजरीवाल.
9.33 AM दिल्लीच्या निर्माण भवन पोलिंग बूथवर मतदानासाठी पोहोचलेल्या सोनिया गांधी.
9.08 AM काँग्रेस नेत्या शीला दीक्षित मतदानासाठी पोहोचल्या.
8.50 AM राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी मतदान केले. त्या दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधून निवडणूक लढवत आहेत.
8.25 AM किरण बेदी यांनी मालवीय नगर परिरात मतदान केले. बेदी म्हणाल्या की, दिल्लीकरांना महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि विकसित दिल्ली पाहिजे की नाही, याचा निर्णय आज त्यांना करायचा आहे.
8.15 AM भाजपचे सरचिटणीस राम माधन यांनी मतदान केले.
8.05 AM ग्रेटर कैलाश मतदारसंघातून 'आप' चे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी मतदान केले.
8.00 AM दिल्लीत 70 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू.
7.31 AM किरण बेदी यांनी सूर्याला अर्घ्य देऊन मतदानासाठी जाण्याची तयारी केली.
7.30 AM राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रेसिडेंट स्ट्रीटवरील पोलिंग बूथवर तयारीची पाहणी केली.
7.20 AM घोंडाचे भाजप आमदार साहेब सिंह चौहान यांच्या कारवर हल्ला, चौहान सुरक्षित.
यावेळी होत असलेल्या विधनसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे 13.77 लाख मतदार वाढले आहेत. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत 1,19,32,069 मतदार होते. तो आकडा आता 1,33,09,078 वर आला आहे. त्यातही 37 लाख मतदार 20 ते 29 वयोगटातील आहे. तसेच 18 ते 19 वयोगटातील 2.27 लाख तरुण मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. त्यामुळे तरुण मतदारांची संख्या अधिक असल्याने मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिल्लीत सर्वाधिक मतदानाचा विक्रम 1977 च्या लोकसभा निवडणुकीतील आहे. त्यावेळी 71.31% टक्के मतदान झाले होते.

दिल्लीतील यापूर्वीचे मतदानाचे प्रमाण
वर्ष मतदानाची टक्केवारी
2014 65.07% (लोकसभा)
2013 66%
2008 57.58%
2003 53.4%
1998 49%
1993 61.8%
मतदान 5 टक्क्यांनी वाढण्याचे सर्वेक्षणातील अंदाज
असोचॅमच्या सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला आहे की, दिल्लीत यावेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये सुमारे 5 टक्के वाढ होऊ शकते. युवकांकडून मोठ्या प्रमाणात मतदानाचा अपेक्षा आहे. त्यामुळे यावेळी सुमारे 70% मतदार पोलिंग बूथपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

मतदानाला जाताना हे लक्षात ठेवा
मतदान करण्यासाठी मतदार यादीत तुमचे नाव असणे सर्वात गरजेचे आहे. फोटो असलेली वोटर स्लिपही गरजेची असते. मतदान ओळखपत्र नसेल तरी पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सोबत ठेवावे.
दिल्ली निवडणुकांत प्रथमच...
दिल्लीत यावेळी सुमारे 37 लाख मतदार हे 20 से 29 वयोगटातील आहेत. प्रथमच मुख्यमंत्रीपदाचे दोन्ही उमेदवार नागरी सेवांमधून आलेले आहेत. भाजपच्या उमेदवार किरण बेदी 40 वर्षांपूर्वी IPS अधिकारी होत्या. तर आपचे प्रमुख प्रमुख अरविंद केजरीवाल IAS अधिकारी होते. दिल्लीत प्रथमच 311 मतदार हे वयाची शंभरी ओलांडलेले आहेत.
दिल्लीत मतदार वाढले, उमेदवार घटले...
दिल्ली निवडणुकांमध्ये यावेळी 13.77 लाख मतदार वाढले आहेत. पण उमेदवारांची संख्या मात्र घटली आहे. 2013 मध्ये 810 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र केवळ 673 उमेदवारच मैदानात आहेत. 2013 मध्ये महिला उमेदवारांची संख्या 71 होती. ती यावेळी 63 वर आली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, मतदानाचे PHOTOS