आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Polls: PM Modi To Address Election Rally In Rohini Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'स्विस बॅंक अकाउंट्सबाबत माहिती ठेवणारे स्वत:च्या खात्याविषयीच अनभिज्ञ\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: जाहीर सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) दिल्लीतील रोहिणी भागातील जपानी पार्कमधील जाहीर सभेत कॉंग्रेस आणि 'आप' जोरदार टीका केली. 'स्विस बॅंक अकाउंट्सबाबत माहिती ठेवणारे स्वत:च्या खात्याविषयीच अनभिज्ञ असल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी 'आप' नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
कॉंग्रेसने दिल्लीकरांचे 15 वर्षे उद्‍धवस्त केले आहे. तेव्हा कॉंग्रेस हा सगळ्यात जुना आणि मोठा पक्षा होता. त्यामुळे त्याची उद्‍धवस्त करण्याची ताकदही मोठी होती. त्यानंतर दिल्लीत दुसरा 'टेंपररी पक्ष' (आम आदमी पक्ष) सत्तेत आला, मात्र, त्याच्यात ताकद थोडीच असल्याने त्याने दिल्लीकरांचे एक वर्ष वाया घातले, अशा पद्धतीने कॉंग्रेस आणि 'आप'ने दिल्लीकरांचे 16 वर्षे उद्‍धवस्त केल्याचा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. 'कॉंग्रेस' आणि 'आप'ने आधी दिल्लीकरांच्या 'त्या' 16 वर्षांचा हिशेब द्यायला हवा.
आई- मुलावर टीका...
कॉंग्रेसमधील आई-मुलाचे आता कोणी ऐकत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले. कॉंग्रेसला पराभव पचविणे कठीण जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

दिल्लीत एक वर्षांपूर्वी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी 1240 रुपये मोजावे लागत होते. आता, मात्र तेच सिलिंडर जनतेला 605 रुपयांत उपलब्ध करून द‍िले जात असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
'आप'वर साधला निशाणा साधला...
'आप' हा पाठीत खंजिर खुपसणारा पक्ष असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला होता. तसेच बिझनेस क्लासमधून विमान प्रवास केला होता. तसेच 'आप' बनावट कंपन्यांकडून 50-50 लाखांच्या देणग्या घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. यावर केजरीवाल यांनी घणाघाती टीका केली.
'जे लोक स्विस बॅंकेत किती अकाउंट आहे, या विषयी माहिती ठेवतात. मात्र, त्याच्या अकाउंटमध्ये किती रुपये आहे, याबाबत ते अनभिज्ञ कसे राहू शकतात? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. देशातील जनता फ्रॉड व्यक्तीला कधी माफ करणार नाही,' नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

दिल्लीतील जनतेचा मानले आभार...
नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सात जागांवर भाजपला विजय मिळला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही दिल्लीकरांनी भाजपला असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नरेंद्र मोदींनी जनतेला केले. दिल्लीतील जनतेने दिलेले प्रेम व्याजासहीत परत करणार असल्याचे वचनही मोदींनी दिले.
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडकडडूमा आणि द्वारका येथील सभांमध्ये संबोधित केले होते. जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर जपानी पार्कवर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. तसेच सभेला आलेल्या लोकांना बसण्यासाठी हजारोंच्या संख्येने खुर्च्या आणल्या होत्या. पाच ठिकाणी टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करण्‍यात आली होती. तसेच मोदींच्या सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जपानी पार्क भागातील वाहतूक बंद करण्‍यात आली होती.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे फोटो...