आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीला महाप्रदूषणाचा विळखा; दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवा बनली विषारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली व एनसीआरमध्ये पसरलेल्या धुक्यामुळे आणि वायुप्रदूषणाने सगळे विक्रम मोडीत निघाले आहेत. येथील हवा इतकी विषारी बनली आहे की, परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास लंडनमध्ये १९५२ साली झालेल्या मृत्युकांडाप्रमाणे दिल्लीची अवस्था होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. शहरातील हवेचा दर्जा निम्नस्तरावर पोहोचला आहे. हवेत अनेक प्रकारचे छोटे धुळीचे कण लंडनमधील १९५२ च्या परिस्थितीप्रमाणेच खराब आहेत. तथापि, हवेत सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण नियंत्रणात आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अनुमित्रा चौधरी यांनी सांगितले : लंडनमध्ये १९५२ मध्ये अशाच धुरक्यामुळे ४ हजार लाेकांचा मृत्यू ओढवला होता. तेव्हा एसओटूचे प्रमाण उच्च स्तरावर होते. पीएम पातळी ५०० मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी होती. दिल्लीत एसओटूची पातळी जास्त नसली तरी दिवाळीत अनेक प्रकारच्या वायूचा स्तर वाढला.

प्रदूषणाची कारणे
फटाक्यांचा धूर व हवा नसल्याने परिस्थितीत बिघाड
१ फटाक्याच्या धुरांची तीव्रता ४६४ सिगारेटइतकी

चेस्ट रिसर्च फाउंडेशनच्या मते :
सर्वाधिक प्रदूषण फटाक्यांमुळे होते. सापाची गोळी, फटाक्यांची लड, फुलझाड आणि फुलबाज्या, चक्री इत्यादी फटाके २००० पट अधिक पार्टिक्युलेट मॅटर सोडतात. एक फटाक्याचा धूर ४६४ सिगारेटच्या धुराइतका असतो. चिनी फटाके पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फर सोडतात.

धुक्यामुळे फटाक्यांचा धूर वातावरणात कोंडला
सीएसअायचे शास्त्रज्ञ विवेक चट्टोपाध्याय यांनी म्हटले :
फटाक्यांचा धूर धुक्यामुळे कोंडला गेला. हवा वर न गेल्यामुळे ती अजूनही पसरलेली नाही. जर हवामान स्वच्छ असेल तर प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. धुके कायम राहिल्यास दोन-तीन दिवस असेच वातावरण कायम राहील.

हवेचा प्रवाह कारणीभूत
दिवाळीत हवेची गती १.३ मीटर/सेंकद होती. हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तर पश्चिमी हवेची गती कमी आहे. काही दिवस अशीच राहिल. पंजाबात ३२० लाख टन पिकांचा कचरा तसेच डंपिंग ग्राउंडच्या आगीने धुके वाढले.

दिल्लीत श्वसन विकारांत ६० टक्के वाढ
दिल्लीमध्ये श्वास घेण्यास त्रास, दमा आणि अॅलर्जीचे आजार वेगाने बळावत आहेत. सर गंगाराम रुग्णालयाचे वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. एस. पी. ब्योत्रा सांगतात : याआधी प्रदूषणाशी संबंधित आजाराची प्रकरणे १५ ते २० टक्के इतकी येत होती. परंतु यात वाढ झाली असून आता दमा आणि ब्राँकायटिसचे रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
प्रदूषकांचा (पीएम) प्रभाव २.५ टक्के
-पर्टिक्युलेट मॅटर आपण श्वास घेताना तोंडावाटे आणि गळ्यातून शरीरात जातो.
-पीएमचे २.५ कण फुप्फुसात जातात. हे कण हवेत असलेली विषारी रसायने पाेहोचवतात. तेथे हे रसायन फुप्फुसासाठी घातक सिद्ध होते.
-पीएमच्या मोठ्या कणांचा म्हणजे पीएमच्या १० कणांचा परिणाम खोकला, शिंकणे, गिळण्याने कमी होतो.
मास्कच्या विक्रीत १० पट वाढ, मूल्य २२०० रुपये
दिल्लीमध्ये मास्कच्या विक्रीत १० पटीने वाढ झाली. यामुळे साठा कमी पडतो आहे. बाजारात ९० पासून २२९९ रुपये किंमतीचे मास्क उपलब्ध आहेत. अॅमेझॉनवर मास्कची मागणी १३ पटीने वाढली. तर विक्रीतही ६ पट वाढ झाली आहे.

एनसीआरमध्ये चार दिवसांत हवा शुद्धीकरण उपकरणांची मागणी ५० % वाढली
असोचेमच्या मते, एनसीआरमध्ये गेल्या चार दिवसांत हवा शुद्धीकरण उपकरणांच्या मागणीत ५० टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये सप्टंेबरच्या तुलनेत तिप्पट वाढ नोंद झाली.

नासाने म्हटले; सॅटेलाइटने चित्र घेणे अवघड
नासाने उत्तर भारताचे चित्र पाठवले असून पंजाबमध्ये पिके जाळण्याचा धूर दिल्लीत पोहोचला. यामुळे सॅटेलाइटद्वारे दिल्लीचे छायाचित्र घेणेही अवघड झाले.

सरकारने सर्वोच्च न्यायालय व एनजीटीचे आदेश झुगारले
सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि एनजीटीने हवेतील वाढत्या प्रदूषणाबाबत गेल्या एक वर्षात केंद्र, दिल्लीसह अन्य राज्य सरकारांना अादेश दिले. पण त्यावर अंमलबजावणी झालीच नाही.
बातम्या आणखी आहेत...