आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली बलात्कार प्रकरणी फाशीच्या शिक्षेवर होणार रोज सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालय डिसेंबर 2012 मधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर दररोज सुनावणी करणार आहे. न्या. रेवा क्षेत्रपाल आणि प्रतिभा राणी यांनी दोषी मुकेश (26), अक्षय ठाकूर (28), पवन गुप्ता (19), विनय शर्मा (20) यांना आव्हान याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. दोषींच्या वकिलांनी जलदगतीच्या सुनावणीस विरोध केला होता. पोलिसांनी दोषींना न्यायालयात आणल्यानंतर महिलांच्या एका गटाने आरोपींना मारहाण करण्याची परवानगी मागितली. पोलिसांनी महिलांना कोर्टरूममध्ये प्रवेश नाकारला.