आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Rape Case : Delhi HC Seeks Centre’s Reply On Steps Post Release Of Juvenile

अल्पवयीनाच्या सुटकेनंतर काय पावले उचलणार? सरकारला नोटिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०१२ मधील निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर केंद्र सरकारला नोटीस जारीकेली आहे.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यात अल्पवयीन आरोपीचा समाजाला धोका आहे. वर्तनात सुधारणेची हमी मिळाल्याशिवाय त्याची सुटका केली जाऊ नये, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्यायमूर्ती राजीव सहाय अँडलॉ यांच्या पीठाने सुटकेनंतर अल्पवयीन आरोपीला सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहितीदेखील मागवण्यात आली आहे. आरोपीची (आता २१ वर्षांचा) तीन वर्षे बालसुधारगृहात राहिल्यानंतर १५ डिसेंबर रोजी सुटका होणार आहे. तूर्त तरी त्याची सुटका होणार नाही.त्यासाठी व्यवस्थापन करणारी समिती तयार करणार का? अशी विचारणाही कोर्टाने केली.