आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Rape Case: Offender Shiv Kumar Yadav Confessed His Crime

दिल्ली अत्याचार प्रकरण :आरोपी शिवकुमार यादवची गुन्ह्याची कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैनपुरी - दिल्लीतील बलात्काराचा आरोपी शिवकुमार यादवने दिल्ली पोलिसांसमोर २७ वर्षीय पीडित महिलेला मारहाण केल्याचे तसेच तिचा गळाही दाबण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले आहे. शिवकुमारवर यापूर्वीही बलात्कार व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिस २० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणार आहे. पोलिसांनी उबेर टॅक्सी सर्व्हिस आणि चालकाविरोेधात फसवणुकीचे नवे आरोप दाखल केले आहेत. सुरक्षित प्रवास आणि अधिकृत चालकाचा दावा करणा-या उबेर कंपनीवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने उबेर कंपनीला नोटीस पाठवली आहे.

गावातील जमीन विकून कार खरेदी
शिवकुमारने २ वर्षांपूर्वी गावातील जमीन विकून मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर खरेदी केली होती. पाच महिन्यांपूर्वी उबेर कॅब सर्व्हिसमध्ये चालक भरती सुरू असल्याचे त्याला कळले. त्यानंतर त्याने दलालाच्या माध्यमातून दिल्ली सराय काले खां येथील परिवहन कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे घेतली व कंपनीत रुजू झाला.