आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली बलात्कार: पोलीसांनी केली आरोपी कॅब ड्रायव्हरवर बक्षीसाची घोषणा, माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नवी दिल्लीः ६ डिसेंबर रोजी कॅबमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला एका चुकीच्या व्यक्तीला आरोपी समजून पकडले होते, मात्र आरोपी शिवकुमार अजूनही फरारच आहे. मात्र आता त्याची स्विफ्ट डिझायर पोलिसांना मथूरा येथे सापडली आहे. पोलिसांनी आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहिर केले आहे. या प्रकरणी आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. मथूरा येथील एसएसपी मंजिल सैनी म्हणाले की, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल."
काश्मीर दहशतवादी हल्ला आणि बाबरी मशिद पाडण्यात आलेला दिवस यामुळे राजधानी दिल्लीमध्ये हाय अॅलर्ट लावलेले असताना एका कॅब चालकाने 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार केला. ही तरूणी एका एमएनसी कंपनीत एनालिस्ट आहे. ही कॅब एका अमेरिकन कॅब कंपनीच्या युबर या मोबाईल अॅपवरून बुक करण्यात आली होती. घटनेला एक दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी कॅब चालक शिवकुमार यादवला पकडण्यात यश आलेले नाही. मात्र त्याची स्विफ्ट डिझायर कार मथूरावरून मिळाली. पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरने तिला लोखंडाची सळई दाखवून पोट फाडण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. यानंतर तिला घरी सोडताना पोलसांजवळ तक्रार केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी दिली. पीडिताने त्या कार चालकाच्या कारचा नंबर आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला.
पोलिसांना पकडण्यात अजूनही यश आले नाही
आरोपीने बलात्कारानंतर आपल्या मोबाईलमधील कंपनीचे अॅप डिलीट केले. युबरच्या गुडगावच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बुकींग आणि बाकी सर्व माहिती अमेरिकेच्या सर्व्हरवर असते. कंपनीच्या अधिकृत ट्वीटवर अकाऊंटवरून कंपनीने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच या प्रकरणात आम्ही अधिकाऱ्यांची सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे असे सांगितले. रविवारी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती, मात्र हा व्यक्ती आरोपी नसल्याचे कळाल्यावर त्याला सोडण्यात आले.

काय आहे संपूर्ण घटना
पीडित तरूणीही उत्तर दिल्लीतील इंद्रलोक येथील रहिवाशी आहे. पीडिता शुक्रवारी रात्री सात वाजता ऑफीससुटल्यनंतर मित्रांच्या कारमध्ये जेवणासाठी गेली. तेथे तिने दारूसुध्दा घेतली. यानंतर तिने युबर या मोबाईल अॅपवरून एक कॅब मागवली. पीडिता या स्विफ्ट डिझायर कॅबने रात्री 9.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाली. या तरूणीने आपल्या तक्रारीमध्ये असे सांगितले आहे की,"घरी जात असताना मी कॅबच्या मागच्या सीटवर बसले होते. मला झोप येत होती. काही मिनिटांनी मी पाहिले की, कार एका निर्जन ठिकाणी थांबली आहे, आणि ड्रायव्हर माझ्याशी असभ्य वर्तन करत आहे. मी त्याला विरोध केल्यानंतर त्याने मला मारले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला.