आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत ईशान्येकडील अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नीडो प्रकरण चर्चेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नीडो हत्या प्रकरणाला काही दिवस जात नाहीत तोच ईशान्येकडील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मुनिरका परिसरात एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. आरोपी पीडित मुलीच्या घरमालकाचा मुलगा असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, असे पीडितेने सांगितले आहे. पीडिता मुळची मणिपूर या राज्यातील आहे. ती कुटुंबासह दिल्लीत भाड्याने राहते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तिच्या घरमालकाच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी याची तक्रार पोलिसांना दिली. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी घेतली आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचे या चाचणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत आणखी एक दामिनी, वाचा पुढील स्लाईडवर