आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Student Allegedly Gang raped In Moving Car, Thrown Onto Road

दिल्लीत धावत्या कारमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत बुधवारी तीन युवकांनी एका अल्पवयीन युवतीवर चालत्या कारमध्ये बलात्कार करून नंतर तिला रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले.दक्षिण दिल्लीत सरोजनी नगर येथे ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी शाळेत जात असताना एका अल्पवयीन युवतीचे तीन युवकांनी अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर चालत्या कारमध्ये अत्याचार केले.

या आरोपींमध्ये मुलीच्या चुलत भावाचाही समावेश आहे. वैद्यकीय अहवालातून मुलीवर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलीला सरोजनीनगर भागात रस्त्यावर फेकून दिले.