नवी दिल्ली- पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यावर चढलेल्या युवकाचा पाय घसरला नाही तर त्याने आत्महत्या केली, असा दावा प्राणी संग्रहालयाचे जनसंपर्क अधिकारी रिझवान ए. खान यांनी केला आहे. दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यानंतर वाघाने केलेल्या हल्ल्यात मकसूद नावाचा हा युवक ठार झाला होता.
यासंदर्भात रिझवान ए. खान यांनी सांगितले आहे, की सुरक्षा रक्षकांसमोरच मकसूद पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यावर चढला होता. त्यावर सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकले होते. पण त्याने काही एक ऐकले नाही. उलट तो मोबाईलच्या कॅमेऱ्यात फोटो काढण्यात दंग होता. अखेर सुरक्षा रक्षकांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर मकसूदने वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली. जर मकसूदचा पाय घसरला असता तर सुरक्षा रक्षकांसमोरच तो पिंजऱ्यात पडला असता.
पुढील स्लाईडवर बघा, पांढऱ्या वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर वाघाने कसे ठार मारले मकसूदला...तसेच या घटनेचा व्हिडिओ...