आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीपकुमार म्हणालाः दलित असल्याची शिक्षा; सीडी बनावट- चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आक्षेपार्ह व्हिडीओत अडकलेले दिल्लीचे माजी महिला बालकल्याण मंत्री संदीप कुमार यांनी दलित असल्याची शिक्षा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. संदीप यांनी गुरुवारी सांगितले, माझ्याविरुद्ध कट रचण्यात आला. पैशाच्या जोरावर माझ्यासारख्या लोकांना अडकवणे मोठी बाब नाही. माझ्या घरी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. मी वाल्मीकी समाजाचा असून पक्षाचा एकमेव दलित चेहरा आहे. दलितांच्या हिताचे बोलतो त्यामुळे मला लक्ष्य करण्यात येत आहे. यानंतरही मी नैतिक आधारावर राजीनामा दिला. संदीप यांनी सीडी बनावट असल्याचा दावा करत त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
दिल्ली विधानसभेतील भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी संदीप यांना त्यांच्या गुन्ह्यासाठी केवळ मंत्रिमंडळातून काढणे पुरेसे नसून पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणे आवश्यक असल्याची मागणी केली.

संदीप कुमार प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.
संदीप कुमार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर आपचे संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यंानी एक व्हिडीओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी म्हटले की, ‘संदीप यांनी आम आदमी पार्टीशीच नव्हे तर संपूर्ण चळवळीला धोका दिला. पक्षाचा कोणत्याही सदस्याने असे केल्यास त्याला अशी शिक्षा मिळेल. पक्षाच्या मूल्यांशी तडजोड करण्याआधी मी मरण पत्करणे पसंत करेल.’ एखादा पुढे जाऊन काय करेल हे त्याच्या कपाळावर लिहिलेले नसते. मात्र, आम्हाला आमच्या सदस्यांच्या चुकीच्या कामाची माहिती मिळताच त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई केली जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर केले आंदोलन...
बातम्या आणखी आहेत...