आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90 नव्हे 100 मिनिटांमध्ये सेमी हायस्पीड रेल्वेने गाठले आग्रा स्टेशन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील पहिली सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणारी ही रेल्वे आज (गुरुवार) दिल्ली ते आग्रादरम्यान धावली. ही रेल्वे 90 मिनिटांत आग्राच्या कँट स्टेशनला पोहोचणे आपेक्षीत होती. मात्र, दहा मिनीट (12.55 वाजता) उशिरा पोहोचली आहे. दहा मिनिट उशिर झाल्यानंतरही आधिकार्‍यांचे म्हणणे आहे, की ट्रायल यशस्वी झाली.
रेल्वेसंबंधी इतर काही तपासण्या आणि ट्रायल यशस्वी झाले तर, आगामी रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वेची घोषणा होण्याची घोषणा आहे. घोषणा झाल्यानंतर दिल्ली ते आग्रा या रेल्वे मार्गावर नोव्हेंबरपासून ही रेल्वे धावणार आहे.
5400HPच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह या रेल्वेचे वैशिष्ट्य आहे. सेमी हायस्पीड रेल्वेच्या चाचणीवेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त पी.के.वाजपेयी आणि दिल्ली व आग्रा येथील विभागीय व्यवस्थापक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रेल्वेत होते.
90 मिनीटांत दिल्ली ते आग्रा
ही रेल्वे नियमीत सुरु झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. या दोन्ही स्टेशनदरम्याचे अंतर 195 किलोमीटर आहे. भारतात सध्या सर्वात वेगवान रेल्वे ही भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस ताशी 150 किलोमीटर वेगाने धावते. या रेल्वेने सध्या दिल्ली ते आगरा प्रवासाला 120 मिनीट लागतात.
सुरक्षीततेची मोठी काळजी
सेमी हायस्पीड रेल्वेच्या चाचणीवेळी सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की या रेल्वेच्या चाचणीदरम्यान रेल्वे पोलिसांचा खडा पाहारा ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तसेच रेल्वे रुळांवर कोणतीही अडचण येणार नाही याकडे लक्ष्य दिले गेले आहे. जवळपास 27 किलोमीटरपर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हायस्पीड रेल्वेच्या नियमीत प्रवासासाठी आवश्यक असणार्‍या रेल्वे रुळांसाठी जवळपास 15 कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे.

मोठ्या स्वप्नांची छोटी सुरवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखविलेले आहे. दिल्ली - आग्रा या मार्गावर ताशी 160 वेगाने रेल्वे सुरु झाली तर, या स्वप्नाचे ते पहिले पाऊल मानले जाईल.

(छायाचित्र - दिल्लीहून आगराला रवाना होणारी पहिली सेमी हायस्पीड ट्रेन. दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर )