आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-लाहोर बससेवेत ६० टक्क्यांनी दरवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली-लाहोर बसच्या प्रवासी दरात तब्बल ६० टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. दिल्ली परिवहन महामंडळातील सूत्रांनी ही माहिती दिली असून नवीन दरानुसार दिल्ली ते लाहोरदरम्यानच्या बस प्रवासासाठी नागरिकांना आता १५०० रुपयांऐवजी २४०० रुपये भाडे आकारले जाईल. भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झालेल्या या बससेवेच्या प्रवासी दरात ६० टक्क्यांएवढी मोठी वाढ भाजपच्याच मोदी सरकारमध्ये झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवरही ही दरवाढ गंभीर मानली जात आहे.

७ वर्षांपासून दरवाढ करण्यात आली नव्हती. १ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू झाला आहे. मार्च १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते दिल्ली-लाहोर बससेवा सुरू करण्यात आली होती. त्या वेळी हे दर केवळ ८०० रुपये होते. कारगिल युद्ध आणि २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ल्याच्या वेळी या बससेवेत खंड पडला होता.