नवी दिल्ली- देशावर मोठे वीज संकट कोसळले आहे. जवळपास 50 टक्के विद्युत निर्मिती केंद्रात फक्त सातपेक्षा कमी दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) थर्मल पॉवर केंद्रांचा समावेश आहे. या थर्मल पॉवर केंंद्रांची एकूण वीज उत्पादन क्षमता 20,000 मेगावॅटपेक्षा अधिक आहे.
दुसरीकडे, दिल्लीकरांना वीज दरवाढचा शॉक बसला आहे. दिल्लीत वीज महागली आहे. 8.32 टक्क्यांने विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एनटीपीसीने घेतला आहे.
भीषण उकाडा त्यात लांबलेला मान्सून, अशा परिस्थितीत सामान्य जनतेला महागाई भार सहन करावा लागणार आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या (सीईए) 15 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोळशावर आधारित 100 विद्युत निर्मिती केंद्रांपैकी 46 केंद्रात सात दिवसांपेक्षा कमी दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सगळ्या मोठी वीज उत्पादक एनटीपीसीमध्ये कोळसा मोठ्या प्रमाणात लागतो. कोसळा टंचाईमुळे एनटीपीसीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
एनटीपीसीच्या 23 केंद्रांपैकी आठ केंद्रात फक्त दोन दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे.
झज्जर (1,500 मेगावॅट), रिहंद (3,000 मेगावॅट), सिंगारोली (2,000 मेगावॅट), कोरबा (2,600 मेगावॅट), सिपत (2,980 मेगावॅट), विंध्याचल (4,260 मेगावॅट), सिम्हाद्रि (2,000 मेगावॅट), रामागुंडम (2,600 मेगावॅट) या केंद्रांचा समावेश आहे. कोल इंडियातर्फे कमी पुरवठा करण्यात आल्याने हे संकट उभे ठाकले असल्याची चर्चा सुरु आहे.
भीषण उकाड्यात उत्तर व मध्य भारतात मोठ्या प्रमाणात वीज कपात केली जात आहे. त्याचा प्रतिकृल परिणाम उद्योग क्षेत्रावरही दिसत आहे. विशेष म्हणजे मान्सून लांबल्यामुळे जनता कमालीची त्रस्त झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा कसे वाढतील दर....