आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोइफल तरुणींनी केला रिक्षा चालकावर बलात्‍काराचा प्रयत्‍न; दिल्‍लीतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली – येथील सफरजंग एन्क्लेव्ह या उच्‍च्‍भ्रूंच्‍या वस्‍तीमध्‍ये दोन तरुणींनी एका रिक्षाचालकावर बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्‍न केला. शिवाय त्‍याचे कपडे काढून एमएमएस बनवल्‍याचा प्रकार आज (गुरुवार) उघडकीस आली. यापैकी एक तरुणी विदेशी असून, ती फारार झाली आहे तर अन्‍य तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित 41 वर्षीय रिक्षा चालकाने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले, मंगळवारी रात्री इग्नू रोडवरून रेणू लालवानी (32) ही युवती रिक्षात बसली. तिला तिच्‍या घरापर्यंत सोडले. पण, जवळ पैसे नाहीत ते घेण्‍यासाठी घरात ये, असे म्‍हणत तिने घरात यायला सांगितले. घरात प्रवेश करताच तिने दरवाजा आणि खिडक्‍या बंद करून घेतल्‍या. शिवाय शरीरसंबंध ठेवण्‍याचा प्रस्‍ताव दिला. तिला नकार देताच तिने जबरदस्‍ती केली. यावेळी तिने आपले कपडे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. हा सर्व प्रकार तिची एक विदेशी मैत्रीण शूट करत होती, असा आरोप त्‍यांनी केला. त्‍या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करून रेणू हिला अटक केली आहे तर तिची मैत्रीण फरार झाली आहे.
अशी केली सुटका
तब्‍बल दोन तास आपण रेणू हिच्‍या घरात होतो. तिने आणि तिच्‍या मैत्रिणीने आपला प्रचंड छळ केला. कपडे फाडून जबरस्‍ती दारू पाजण्‍याचा प्रयत्‍न केला. दरम्‍यान, ती आणि तिची मैत्रीण कशातरीसाठी आतील खोलीत गेल्‍या. याच संधीचा फायदा घेत आपण वरच्‍या मजल्‍यावरून खाली उडी मारली आणि 100 नंबर डायल करुन पोलिसांनी माहिती दिली. यात पीडित रिक्षा चालकाचे दोन्‍ही पायांची हाड मोडले आहेत.