आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीयू’ प्रवेशासाठी हवेत 100% , नाहीतर कटाप!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुणपत्रिकेवर गुणांचा आकडा 100 टक्क्यांच्या आसपास असेल तरच तुमचा दिल्ली विद्यापीठातील (डीयू) आघाडीच्या महाविद्यालयात प्रवेश पक्का होऊ शकतो. डीयूतील रामलाल आनंद महाविद्यालयात बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘कटऑफ’च्या आकड्याने 100 टक्के गुणांची पातळी गाठली आहे.

यंदाच्या वर्षीही दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालयांत ‘मिशन अँडमिशन’ अत्यंत खडतर राहणार असल्याचे पहिल्या कटऑफच्या यादीतून स्पष्ट झाले आहे. हिंदू कॉलेज आणि भास्कराचार्य कॉलेज ऑफ अप्लाइड सायन्समध्ये वाणिज्य व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे कटऑफ 96.75 ते 99.75 टक्के आणि 97 ते 99.75 टक्क्यांपर्यंत होते. गेल्या वर्षी हिंदू कॉलेजमध्ये कटऑफ 96.25 ते 99.25 टक्क्यांचे होते.

राजधानी दिल्लीत दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी - पालकांना बराच संघर्ष करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक महाविद्यालयांत प्रवेशासाठी कटऑफ लिस्ट 100 - 99 मार्कांवरच जाऊन थांबले आहे.

दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉर्मस चे कटऑफ 100 वर जाऊन पोहोचले आहे. हिंदू कॉलेज, भास्कराचार्य कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणचे कटऑफदेखील 97 - 99 पर्यंत आले आहे. कॉर्मस व इकॉनॉमिक्समध्ये कटऑफ सर्वात जास्त राहिले. अनुसूचित जाती, जमाती, अपंग व इतर प्रवर्गातील प्रवेशासाठीचे कटऑफदेखील जास्तच राहिले. सायन्स, मॅथ्स, फिजिक्सला विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली. या वर्षी सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स, बी. टेक अभ्यासक्रमांसाठीही अनेक विद्यार्थ्यांनी पसंती दाखवली.

कॉर्मससाठी हवेत 90 टक्के
कॉर्मसच्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रोश मिळणे कठीण झाले आहे. कारण त्याचे कटऑफ 90 टक्क्यांवर गेले आहे. हंसराज कॉलेजमध्ये कटऑफ 96.75 ते 98.75 टक्के, लेडी श्रीराम महाविद्यालयात 97.75 ते 98.75, शहीद भगतसिंग महाविद्यालयात 96 ते 99 व श्री व्यंकटेश्वर महाविद्यालयात 96.75 टक्के इतके कटऑफ आले आहे.

इंग्रजी, पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी चुरस
इंग्रजी, पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश आतापर्यंत प्रवेश परीक्षेद्वारे निश्चित होत असत. यंदा त्याला थेट प्रवेश दिला जाणार आहे. परंतु त्यासाठीही कटऑफ 98 टक्क्यांचा आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी सहा महाविद्यालयांत त्याचे कटऑफ 90 टक्के राहिले.

इकॉनॉमिक्सचा मार्गही खडतरच
अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठीही कटऑफ खूपच उंचीवर राहिले. हिंदू कॉलेजमध्ये 97.5, लेडी श्रीराममध्ये 97.75 टक्के राहिले. हंसराज महाविद्यालयात 97.25, मिरांडा हाऊसमध्ये 96.5 ते 97, किरोडीमलमध्ये 95.5 ते 98.5 तर र्शीराम कॉलेज ऑफ कॉर्मसमध्ये अर्थशास्त्राचे कटऑफ 97 ते 97.5 टक्के इतके आहे.