आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीयू कॅम्पसमध्ये तणाव कायम; नाट्य स्पर्धा रद्द, देशविरोधी आशय असल्यास सुरक्षेची शाश्वती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रामजस महाविद्यालयातील मारहाणीच्या प्रकरणानंतर दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण परिसरातील तणाव अजूनही कायम आहे. त्यामुळे आता एसजीटीबी खालसा कॉलेजने पथनाट्यस्पर्धा रद्द केली आहे.
 
दक्षिण परिसरात शांतता निर्माण झाल्यानंतरच नाट्य स्पर्धा आयोजित केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी संघटने डुसूचे अध्यक्ष तथा अभाविपचे सदस्य अमित तंवर म्हणाले, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्यात आल्या आहेत. 
 
स्पर्धेच्या निमित्ताने सादर होणाऱ्या प्रत्येक नाटकाची संहिता त्यांनी नजरेखालून घातली पाहिजे. त्यानंतरच त्याचे सादरीकरण केले जावे. त्यात देशविरोधी आशय, विषय असल्यास सुरक्षेची खात्री देता येणार नाही. यासंबंधी विद्यार्थी संघटनेने इशारा दिला. त्यावर प्राचार्य जसविंदर सिंह नाट्य स्पर्धा रद्द करत असल्याचे जाहीर केले.
 
‘निर्णय दबावाखाली नाही’
नाट्य स्पर्धा ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली घेण्यात आलेला नाही. सध्याची परिस्थिती पाहून हे ठरवण्यात आले आहे, असा दावा प्राचार्य जसविंदर सिंह यांनी केला.
 
संयोजकाचा दुसरा सूर
महाविद्यालयाचे प्राचार्य दबाव नसल्याचा दावा करत असले तरी नाट्य स्पर्धेचे संयोजक सहायक प्रोफेसर साकेत घोष यांनी मात्र वेगळा सूर लावला. ते म्हणाले, विद्यार्थी संघटना सातत्याने धमक्या देत आहेत. त्यामुळे कार्यक्रम रद्द झाला आहे.
 
काय आहे वाद ?
मंगळवारी रामजस महाविद्यालयातील एका परिसंवादात जेएनयू विद्यार्थी उमर खालिद व शहला राशिद यांना निमंत्रण देण्यात आले होते. एबीव्हीपी विद्यार्थ्यांनी त्यास विरोध दर्शवला होता. दोन्ही बाजूने मारहाण व दगडफेक झाल्यानंतर परिसंवाद रद्द करावा लागला होता.
४०० शिक्षणतज्ज्ञांचे कुलगुरूंना पत्र, जेएनयू संस्कृती धोक्यात जगभराच्या विद्यापीठांतील ४०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी कुलगुरू जगदीश कुमार यांना पत्र पाठवले. जेएनयू संस्कृती व शैक्षणिक स्वातंत्र्य महत्वाचे आहे. परंतु त्यावर सध्या संकट आल्याचे दिसू लागले आहे. जेएनयू प्रशासनाने याबाबत योग्य ती पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत तज्ज्ञांनी पत्रातून काळजी व्यक्त केली आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...