आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi University Graduate Girl Wants To Join ISIS And Become Muslim

दिल्ली ग्रॅज्युएट हिंदु तरुणीला ISIS ची ओढ, वडील आहेत माजी लष्करी अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापिठाच्या एक प्रसिद्ध कॉलेजमधून पदवी घेतलेल्या हिंदु तरुणीने ISIS मध्ये जाण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या वडीलांनी या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेकडून मदत मागितली आहे. आता तिचे काऊंन्सलिंग केले जात असून तरुणी तिच्या हट्टावर कायम आहे. तिला हिंदु धर्म सोडून मुस्लिम व्हायचे आहे. ऑस्ट्रेलियामार्गे सीरियात जाण्याची तिची इच्छा आहे.
काय आहे प्रकरण
या मुलीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तिचे वडील माजी लेफ्टनंट कर्नल आहेत. 20 वर्षांपेक्षा वयाने मोठी असलेली ही तरुणी ऑस्ट्रेलियात पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेली होती. ती दिल्लीला परत आली तेव्हा तिच्या वागणुकीत बराच बदल झाला होता. त्यानंतर वडीलांनी राष्ट्रीय तपास संस्थेला तरुणीच्या 'उद्योगांची' माहिती दिली. तरुणीचे काऊंन्सलिंग करावे अशी मागणी या वडीलांनी केली आहे. त्यानंतर संस्थेने गुप्तचर संघटनेशी संपर्क साधला. आता ही संघटना या प्रकरणात लक्ष देत आहे. आयबीच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा या तरुणीची समजूत काढली आहे.
वडीलांना मुलीबद्दल काय समजले
काही महिन्यांपूर्वी वडीलांना मुलीच्या कॉम्प्युटरमध्ये ISIS शी निगडीत काही इंटरनेट कम्युनिकेशन सापडले. त्यानंतर वडीलांनी डाटा चेक केला. त्यांना आढळून आले, की ती ISIS रिक्रुटर्सच्या संपर्कात आहे. तिला सिरीयाला जायचे आहे. ती आधी धर्म बदलणार होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मार्गे सीरीयाला जाणार होती.
यापूर्वीही काही प्रकरणे आली उघडकीस
- दोन हिंदू तरुणांसह 10 जणांना युएई येथून भारतात नुकतेच डिपोर्ट करण्यात आले. ISIS चा प्रचार करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
- मुंबईच्या कल्याण परिसरातील चार युवक ISIS मध्ये जाण्यासाठी इराकमार्गे सीरियात गेले होते. त्यातील आरिफ मजीद परत आला असून एनआयएच्या कस्टडीत आहे.
- कोलकत्याचा मेहदी बिसवास याला बंगळुरु येथून अटक करण्यात आली. तो ISIS चा ट्विटर हॅंडलर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, ISIS या दहशतवादी संघटनेचा प्रभावित एरिया....