नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठात राम जन्मभूमी मंदिरावर दोन दिवसीय चर्चासत्राला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, यातून विद्यापीठातील वातावरण कुलूषित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप एनएसयूआयसह अनेक विद्यार्थीं संघटनेने केला. शिवाय या चर्चासत्राला तीव्र विरोधही केला. दरम्यान, विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नेमके कशावर आहे चर्चासत्र?
- 'श्री राम जन्मभूमी मंदिर : उदयोन्मुख स्थिती' या विषयावर हे चर्चासत्र आहे.
- कला विभागाच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले असून, अरूंधती वशिष्ठ अनुसंधान पीठ (एव्हीएपी) त्याच्या आयोजक आहेत.
- एव्हीएपीचे अध्यक्ष आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी त्याचे प्रमुख वक्ते आहेत.
- यामध्ये इतिहास संशोधाक, कायदा तज्ज्ञ आणि पुरातत्त्व अभ्यासकही सहभागी आहेत.
- अयोध्या मुद्दयावर इलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निणर्याची माहिती देणे, हाच याचा उद्देश असल्याचे एव्हीएपीचे संयोजक चंद्र प्रकाश यांनी सांगितले.
विरोधकांचे काय आहे मत ?
- 'आयसा' या विद्यार्थी संघटनेने म्हटले, 'या विषयावरील चर्चासत्राचा शिक्षणक्षेत्राची काय संबंध आहे. शिक्षणाचे भगवीकरण करण्यासाठीच त्याला परवानगी दिली', असा आरोपही या संघटनेने केला.
- क्रांतिकारी युवा संघटनेने म्हटले, ''या मुद्दयामुळे कायम वाद होत आला. गरिबी, शिक्षण, बेरोजगारी असे अनेक विषय असताना याच वादग्रस्त विषयावर चर्चासत्र का ?''
पुढील स्लाइडवर वाचा, विद्यापीठाने काय म्हटले ?