Home »National »Delhi» Delhi University Student Union Elections Results Updates

दिल्ली विद्यापीठात 4 वर्षांनंतर NSUI चा झेंडा, काँग्रेस म्हणाले हा RSS विचारधारेचा पराभव

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 15:32 PM IST

  • दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संसद अध्यक्षपदी एनएसयूआयचा रॉकी तुषीद विजयी झाला.
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित एनएसयूआयने चार वर्षानंतर बाजी मारली आहे. एनएसयूआयने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून जॉइंट सेक्रेटरी पदीसाठी एनएसयूआय आघाडीवर आहे. दुसरीकडे एबीव्हीपीने सचिव पद पटकावले असून उपाध्यक्षाच्या शर्यतीतही ते पुढे आहे. मतमोजणी नॉर्थ कॅम्पसच्या कम्यूनिटी हॉलमध्ये सुरु आहे. चार वर्षांपासून अध्यक्षपद हे भाजपची विद्यार्थी आघाडी एबीव्हीपीकडे होते, मात्र यंदा एनएसयूआयने ते हिसकावून घेतले आहे. एनएसयूआयचा रॉकी तुषीद अध्यक्षपदी विजयी झाला आहे. काँग्रेसने हा आरएसएस विचारधारेचा पराभव असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी मतदान झाले होते. त्यात 50 महाविद्यालयांतील 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. महाविद्यालयांच्या विद्यार्थी संसदेचे निकाल मंगळवारी रात्रीच जाहीर करण्यात आले होते.
एनएसयूआचा रॉकी तुषीद अध्यक्ष तर उपाध्यक्षपदीही एनएसयूआचा कुनाल सहरावत विजयी झाला आहे. सचिवपदी एबीव्हीपीची महामेधा नागर आणि संयुक्त सचिवपदी उमा शंकर विजयी.

Next Article

Recommended