आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

White Tiger Attack: विजयने मकसूदचे एकही अंग खाल्ले नाही, तर दम कोंडल्याने झाला मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीः राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात एका तरूणाला ठार केल्यानंतर विजय नावाच्या या वाघाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दररोज 10 किलो म्हशीचे मांस खाणार्‍या या 200 किलोच्या विजयला निरिक्षणासाठी पुढील चार - पाच दिवसांपर्यंत पशु चिकित्सकांच्या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
प्राणी संग्रहालयाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पनी सेलवम म्हणाले की, हा वाघ गुरूवारपर्यंत काहीच विचित्र वागला नाही. मंगळवारी दुर्घटनेनंतर दुपारी 4.30 वाजता विजयला म्हशीचे मटन खाऊ घालण्यात आले. यानंतर बुधवारीसुध्दा तो नेहमीप्रमाणे जेवला."
या दुर्घटनेत वाघाचा शिकार बनलेला मकसूदच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार त्याचा मृत्यू दम कोंडल्यामुळे झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मकसूदच्या गळ्याला डाव्या बाजूने सहा गंभीर जखमा दिसून आल्या. ज्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
या घटनेच्या अहवालानुसार, वाघाने मकसूदच्या शरीराचा कोणताही भाग खाल्ला नाही. याबद्दल सांगताना डॉ. सेवलम म्हणाले की, "एखाद्या वाघाला मॅन-इटर तेव्हाच म्हणता येते, जेव्हा तो मानवी मांस खातो. विजय मानवी मास खात नाही. त्याला सुरूवातीपासूनच म्हशीचे मटन खाऊ घालण्यात येत होते"

हे सुध्दा वाचा, ...तर वाघाच्या हल्ल्यातून मकसूद वाचला असता?
प्राणिसंग्रहालयाच्या केअरटेकरने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मकसूद खाली पडला तेव्हा विजय शांत होता, आणि त्याचा खेळण्याचा मुड होता.

तर नॅशनल झुलॉजी पार्कचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, लोकांच्या आवाजाने, गोंगाटाने आणि विजयला दगड मारण्याने तो चिडला आणि त्यामुळेच त्याने मकसूदवर हल्ला केला.
प्राणिसंग्रहालयाच्या क्यूरेटर आर. ए. खान यांनी सागितले की, अनेकांच्या मते त्या वाघास ट्रॅक्यूलाईज्ड (बेशुध्द) करायला हवे होते. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही प्राण्याला बेशुध्द पाडण्यासाठी जवळपास 15 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र येथे संपूर्ण घटना केवळ 4-5 मिनिटात घडली आहे. तरीही असे म्हणतात की, मकसुदला वाचवण्यासाठी 10-15 मिनिटे होती. मात्र व्हिडीओवरून हे स्पष्ट होते की, ही संपूर्ण घटना केवळ दोन ते अडीच मिनिटातच घडली आहे."

पुढील स्लाईडमध्ये वाचा, पिंजर्‍यात आरामात फिरतोय विजय...