आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Will Be The First Official Flight Of The World \'Suprjnbo\' Aircraft

भारतात आज पहिल्यांदा येणार जगातील सगळ्यात मोठे दुमजली प्रवाशी विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सात वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर जगातील सगळ्यात मोठे दुमजली प्रवाशी 'एअरबस 380' चे पहिल्यांदा भारतात आगमन होणार आहे. सिंगापूर एयरलाइन्सचे 'एअरबस 380' आज (शुक्रवार) रात्री आठ वाजेच्या सुमारास दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल-थ्री वर उतरेल. भारतीय प्रवाशांनाही आता या 'सुपरजंबो' विमानातून प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
सिंगापूर एअरलाइन्स आजपासून दिल्ली आणि मुंबईसाठी नियमित सेवा सुरू करत आहे. यासाठी सुपरजंबो विमाने सेवेत सहभागी करून घेतले आहे. दिल्ली एअरपोर्टवर 60 टन वजन असलेल्या दुमजली विमानानाच्या स्वागतासाठी अभूतपूर्व सुविधा करण्‍यात आली आहे.
एअरबस ए-380 यापूर्वी 2007 मध्ये भारतात ट्रायल घेण्यासाठी आले होते. आता मात्र, तिकिट घेऊन या सुपरजंबो विमातनातून प्रवास करण्‍याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. एअरबसमध्ये एकूण 853 प्रवाशी बसू शकतात. फर्स्ट क्लास, बिझनेस आणि इकॉनमी क्लास आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिल्ली एअरपोर्टवर येणार्‍या 'सुपरजंबो'बाबत...