आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Will Host Ghulam Ali Saheb On November 8, Modi Sarkar Provided Security

गुलाम अलींच्या कॉन्सर्टचे संरक्षण 'आप'च्या ‘आर्मी’कडे; संजय सिंह यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील मैफल रद्द झाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या गझल गायक गुलाम अली यांची कॉन्सर्टची सर्व जबाबदारी आता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या फौजेकडे असेल. महाराष्ट्रात ही मैफल रद्द झाल्यानंतर केजरीवाल सरकारने दिल्लीत याचे आयोजन केले आहे.

मैफल निर्विघ्न पार पडावी यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सज्ज आहेत. मैफिलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही तयारी केली आहे. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच कार्यकर्त्यांवरही असेल, असे आपचे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी गुरूवारी केले. महाराष्ट्रात भाजपची पोलिस आहे. दिल्लीत मोदींची पोलिस आहे. त्यामुळेच गरज पडल्यास आम्ही आमचे लष्कर अर्थात कार्यकर्ते तैनात करू. परंतु कोणत्याही पातळीवर मैफिलीत अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे सिंह म्हणाले. दुसरीकडे गेल्या चाळीस वर्षांपासून भारतात कार्यक्रमासाठी मी येत आहे. त्यामुळे यापुढेही रसिकांसाठी येत राहिल, असे गुलाम अली यांनी म्हटले होते.

मोदींनीही व्यक्त केली होती नाराजी
शिवसेनेने केलेल्या विरोधावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली होती. कलावंताच्या बाबतीत हे घडणे वाईट असल्याचे मोदींनी म्हटले होते.
सेनेचा विरोध : सीमेवर पाककडून सातत्याने हल्ले होत आहेत. अनेक भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या कलावंतांना भारतात कार्यक्रम करू दिला जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नियोजित कार्यक्रम रद्द झाले.

दिल्लीचा संपर्क
मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दिल्ली सरकारने गुलाम अलींशी संपर्क साधला होता. दिल्लीत कार्यक्रम घेण्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले होते. हे निमंत्रण गुलाम अलींनी स्वीकारले व गझल मैफलीसाठी दिल्लीला येऊ, असे आश्वासन गुलाम अली यांनी सरकारला दिले होते.