आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची अब्रू अब्रू आहे, आणि माझी -कुमार विश्वास यांना पीडितेचा टोकदार सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अफेअर असल्याच्या अफवेवर आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांच्यावर याच पक्षाचा एका कार्यकर्तीने आरोप केले आहेत. विश्वास यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या कार्यकर्तीने केली आहे. दरम्यान, दिल्ली महिला कमिशनच्या चेअरमन बरखा शुक्ला यांनी आज विश्वास यांना आपली बाजू मांडण्याची विनंती केली होती. यासाठी कमिशनच्या कार्यालयात पीडित महिला आणि तिचा पती उपस्थित होते.
यावेळी बोलताना पीडिता म्हणाली, की कुमार विश्वास यांची अब्रू ही अब्रू आहे, त्यांच्या पत्नीचे अब्रू ही अब्रू आहे, आणि माझी अब्रू ही अब्रू नाही का... त्यांनी लोकांना याचे उत्तर द्यायला हवे. आम्हाला लोकांमध्ये राहायचे आहे. समाजाला तोंड दाखवायचे आहे. काल अरविंद केजरीवाल म्हणाले, की आमच्या कुटुंबाला माफ करा. पण त्यांची मुले मुले आहेत, आणि माझी मुले माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत का...
पीडितेचा पती म्हणाला, की माझा माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे. पण माझे शेजारी आणि कुटुंबीय माझ्या पत्नीवर संशय व्यक्त करीत आहेत. कुमार विश्वास आणि त्यांच्या पत्नीने येथे यावे. कोणत्याही प्रकारचे अफेअर नसल्याचे स्पष्ट करावे.
यावेळी बरखा शुक्ला म्हणाल्या, की आम्ही कुमार विश्वास यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले होते. पण ते आले नाहीत. पीडिता आणि तिचा पती आला आहे. आप हा गद्दारांचा पक्ष आहे. त्यांना महिलांशी काही देणेघेणे नाही. आम्ही त्यांना येथे येण्यासाठी अनेक वेळा विनंती केली आहे. पण त्यांना पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची जराही चिंता नाही.
पुढील स्लाईडवर बघा, पत्रकार परिषदेत पीडिता आणि तिचा पती....