आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Women Commission Call Somnath Bharti Latest News

सोमनाथ भारती पतंगबाजीत दंग, महीला आयोगाकडे पाठवलेल्या वकीलांनी अध्यक्षांशी घातला वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे कायदा मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती आज (शुक्रवार) दिल्ली महिला आयोगासमोर हजर झाले नाही. त्यांना आज दुपारी 3 वाजता आयोगासमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या महिला वकीलांना पाठवले आणि ते पतंगबाजीच्या कार्यक्रमला गेले.
महिला आयोगाच्या अध्यक्ष बरखा सिंह यांनी भारती यांच्या वकीलांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे माध्यमांच्या समोरच वकील आणि आयोगाच्या अध्यक्षांमध्ये जूपली होती. भारती यांच्या या वर्तणूकीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी नायब राज्यपालांकडे करणार असल्याचे बरखा सिंह म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, महिला आयोगासमोर गैरहजर राहून त्यांनी घटनात्मक संस्थेचा अवमान केला आहे. त्यांच्यावतीने त्यांच्या वकील येथे हजर झाल्या, याचा अर्थ त्यांना समन्स मिळाले होते आणि जाणिवपूर्वक त्यांनी येथे येण्याचे टाळले आहे. त्यांनी दिल्लीच्या महिलांचा अवमान केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, 'आप'कडून क्लिन चिट