आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi: Wreath Laying Ceremony Of Martyred Colonel MN Rai Who Lost His Life In The Operation In Tra

कर्नल राय यांच्यावर अंत्यसंस्कार, मुलीने केला सॅल्युट; दहशतवाद्यांनी असे मारले धोक्याने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना मंगळवारी शहीद झालेले कर्नल एम. एन. राय यांचे पार्थिव गुरुवारी दिल्लीत आणले गेले. येथे लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांच्यासह सेना अधिका-यांनी राय यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राय यांच्यावर दिल्लीतील कॅन्टोमेंटमधील बरार स्क्वेअरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करतेवेळी राय यांची पत्नी बेशुद्ध पडली. मात्र, मोठ्या मुलीने बहादुरी दाखवत आपल्या पित्याला सॅल्युट ठोकत अंतिम निरोप दिला. पित्याला सलामी देताना कर्नल राय यांच्या थोरल्या मुलीने गोरखा रायफल्सचे वॉर क्राय "होके के होई ना, होना ही परचा" म्हटले. याचा अर्थ आहे होणार की नाही, नव्हे होणारच. राय यांच्या पत्नीसह मुलाने, मुलीने प्रचंड आक्रोष केल्याने वातावरण फारच गंभीर झाले होते.
42 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर, 39 वर्षीय राय आणि जम्मू पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल संजीव कुमार सिंह हे दोघे पुलावामा येथे मंगळवारी एका दहशतवादविरोधी ऑपरेशनदरम्यान शहीद झाले. या कारवाईत दोन दहशतवादीही मारले गेले. राय यांना मृत्यूच्या एक दिवस आधीच प्रजासत्ताक दिनी युद्ध सेवा मेडलने गौरविण्यात आले होते. राय यांच्या शौर्याबदद्ल लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी म्हटले आहे की, राय म्हणजे पुढे येऊन नेतृत्व करणा-यांसाठी एक आदर्शवंत उदाहरण आहे.
राय यांना भ्याड दहशतवाद्यांनी धोक्याने ठार मारले -
लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांची माहिती मिळताच कर्नल राय, संजीव कुमार सिंह आणि इतर सुरक्षा कर्मचारी श्रीनगरपासून 36 किमी दूर मिंडोरा गावात पोहोचले. कर्नल राय यांना माहिती मिळाली होती की, हिजबुल मुजाहिदीनचा एक स्थानीय दहशतवादी सहका-यासोबत त्याच्या गावात आला आहे. जेव्हा या गावात घेराबंदी करण्यात आली तेव्हा दहशतवाद्याचे पिता आणि भाऊ राय यांना भेटण्यासाठी गेले. दहशतवादी शरण येण्यास तयार असल्याचे सांगितले. राय यांनी जेव्हा शरण येण्यास सांगितले तेव्हा ते राय यांना घरी घेऊन गेले. मात्र, घरासमोर जाताच दहशतवाद्याने अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवादी मारले गेले. मात्र कर्नल राय हे सुद्धा शहीद झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे आदिल खान आणि शिराज दार अशी आहेत. या चकमकीदरम्यान शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत लष्कराचा आणखी एक अधिकारी, एक जवान आणि जम्मूतील पोलिस दलातील कर्मचारी जखमी झाले आहेत.
पुढे पाहा, छायाचित्रांच्या माध्यमातून राय यांना कोणी कोणी वाहिली श्रद्धांजली