आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhis Famous Pandeys Paan Shop Will Serve Obama Special Buttercouch Paan

ओबामा घेतील \'बटरस्कॉच\' पानाचा आस्वाद तर मिशेल यांना भेट मिळणार बनारसी साड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः पांडे पान भंडारचे मालक देवीप्रसाद पांडे)
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येणारे अमेरिकचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर येत आहेत. सोबत त्याची पत्नी मिशेल ओबामा देखील असतील. ओबामा दाम्पत्यासाठी राष्ट्रपती भवनात खास डिनरचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात ओबामा भारतीय लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतील. यासोबत ओबामांना दिल्लीतील सुप्रसिद्ध 'बटरस्कॉच पान'ची मजा अनुभवणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिकेच्या फस्ट लेडी मिशेल ओबामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 बनारसी साड्या भेट देणार आहेत. मिशेल ओबामा अनेक इंटरनॅशनल इव्हेट्समध्ये जॅकवार्ड सिल्क साडीत दिसल्या आहेत.
ओबामांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डिनरमध्ये 'बटरस्कॉच पान' असेल की नाही, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. दरम्यान, बराक ओबामा 2010 मध्ये भारत दौर्‍यावर आले होते. तेव्हा त्यांना 'मघई' आणि 'बटरस्कॉच पान'चा आस्वाद घेतला होता.

दिल्लीतील साउथ ब्लॉकमधील प्रेसिडेंट इस्टेटमध्ये पांडे पान भंडारआहे. येथील बटरस्कॉच पान सुप्रसिद्ध आहे. राष्ट्रपती भवनातील खास डिनरमधील पदार्थांमध्ये पांडे पान भंडारच्या बटरस्कॉच पानाचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पांडे पान भंडारचे संस्थापक नारायण नारायण पांडे यांची तिसरी पिढीने आज संपूर्ण व्यवसाय यशस्वीपणे सांभाळला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मिशेल ओबामांसाठी वाराणसीहून मागवल्या 100 साड्या