आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhis Polluted Air May Force Obama To Stay Indoors

दिल्लीची हवा ओबामांना मानवणार नाही, बंद खोलीतच राहाण्याची आहे इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा लवकरच भारत दौर्‍यावर येणार आहेत. मात्र, त्याआधीच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला दिल्लीच्या प्रदुषणाने त्रस्त केले आहे. दिल्लीतील अमेरिकी दुतावासाच्या अधिकारांच्या माहितीनुसार, दिल्लीतील हवा प्रदुषित असून हवेने प्रदुषणाची धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की ओबामांनी या दौर्‍यात मोकळ्या वातावरणात जाणे टाळाले पाहिजे. दिल्लीची हवा ओबामांना मानवणारी नाही.
हे शक्य नाही?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येत आहेत. हा कार्यक्रम निळ्या आकाशाखाली मोकळ्या वातावणात होणार आहे. जवळपास दोन तास चालणार्‍या या कार्यक्रमात ओबामांना मोकळ्या हवेत बसावे लागणार आहे. सूत्रांची माहिती आहे, की शक्यता आहे या कार्यक्रमात ओबामांसाठी बुलेटप्रुफ कॅबिन तयार केली जाईल आणि त्यात बसून ओबामा या सोहळ्यात सहभागी होतील. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा आणि प्रदुषणाचाही प्रश्न निकाली निघू शकतो.

याविषयावर अमेरिकन दुतावास सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी अमेरिकी दुतावासाने दिल्लीतील प्रदुषणाचा अहवाल तयार केला होता. यात येथील वातावरण स्वास्थ्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले आहे.

फोटो - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ओबामांचे संग्रहित छायाचित्र
पुढील स्लाइडमध्ये, एका जागेवर 20 मिनीटांपेक्षा जास्तवेळ बसत नाहीत ओबामा