आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूती रजा २४ आठवड्यांची, अवधी १२ आठवड्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महिला कर्मचाऱ्यांची प्रसूती रजा १२ आठवड्यांवरून दुप्पट करत ती २४ आठवड्यांवर नेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. मातृत्व लाभ कायदा १९६१ कायद्यान्वये या वाढीचा प्रस्ताव आहे.
कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सोमवारी लोकसभेत याबाबत लेखी उत्तर दिले. त्यानुसार, नोकरदार महिला कायद्याच्या ५ (३) कलमानुसार गर्भवती महिला १२ आठवड्यांच्या प्रसूती रजेस पात्र आहे. पैकी ६ आठवड्यांची रजा संभाव्य प्रसूतीच्या सहा आठवड्यांपूर्वीपासून घेता येते. दत्तात्रेय म्हणाले की, दुप्पट बोनस आणि नोकरी बदलताना ग्रॅच्युइटी पोर्टेबिलिटीचा प्रस्ताव विचाराधीन नाही.