आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंघोषित संत-भोंदूबाबांवर परिषद आणणार टाच, नियामक मंडळाबद्दलचा निर्णय उद्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वयंघोषित संत आणि भोंदूबाबांवर लवकरच टाच येण्याची शक्यता आहे. देशातील संताची शिखर संस्था अखिल भारतीय अखाडा परिषदेने भोंदूबाबा आणि स्वंयघोषित संताची यादी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, स्वतःला संत घोषित करून अनैतिक काम करणारे अनेक भोंदू संत संप्रदायात घुसले असून ते अध्यात्माची प्रतिमा मलिन करीत आहेत.

दरम्यान, स्वयंघोषीत बाबा आणि ज्योतिषांचे राष्ट्रीय नियामक मंडळ स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर आणि त्यांची पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

या याचिकेत म्हटले आहे, की देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक स्वयंघोषित संत, बाबा, धर्मगुरु आणि ज्योतिष आहेत. त्यांचा सर्वसामान्य जनतेवर मोठा प्रभाव आहे. यातील अनेक संत भक्तांना विविध अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे, जमीन आणि इतर स्वरूपात धन संचय करीत आहेत.