आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्दूतून नीट परीक्षा आयोजित करण्‍याची मागणी, केंद्र सरकारला SCची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट- २०१७ उर्दू माध्यमातूनही आयोजित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व एमसीआयला उत्तर मागितले आहे.  
 
एसआयओने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्या. कुरियन जोसेफ व आर. भानुमती यांच्या खंडपीठाने नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित राज्यांनी विनंती केल्यास कोणत्याही भाषेत ही राष्ट्रीय परीक्षा घेण्याची आपली तयारी आहे, असे एमसीआयने यापूर्वी न्यायालयास सांगितले होते.
 
बातम्या आणखी आहेत...