नवी दिल्ली - राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या सभागृहातील अनुपस्थितीचा मुद्दा मंगळवारी उपस्थित करण्यात आला. समाजवादी पक्षाचे खासदार नरेशचंद्र अग्रवाल यांनी या दोन्ही सदस्यांबद्दल उपसभापतींनी निर्णय घेण्याची मागणी केली. अग्रवाल म्हणाले, जर विजय माल्ल्याला राज्यसभेतून काढता आले तर या दोन्ही सदस्यांना का नाही.
आणखी काय म्हणाले अग्रवाल
- अग्रवाल म्हणाले, राज्यसभेत 12 सदस्य हे नियुक्ती असतात. यापैकी सचिन आणि रेखा हे या अधिवेशन काळात एकदाही सभागृहात आलेले नाही. मात्र बाहेर हे जाहिरातींमध्ये काम करतात. जर या सभागृहाने विजय माल्याला बाहेर काढले आहे तर, या सदस्यांवर कारवाई का होऊ शकत नाही.
- अग्रवाल यांच्या टिप्पणीवर राज्यसभेचे उपसभापती कुरियन म्हणाले, त्यांनी सुटी घेतलेली आहे. सर्व सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे ही सर्वांचीच इच्छा आहे.
- नियुक्त सदस्यांमध्ये रेखा आणि सचिन यांच्याशिवाय अनु आगा, राजे छत्रपती संभाजी, स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली, नरेंद्र जाधव, एम.सी. मेरीकोम, के. पारासरन, गोपी सुरेश, सुब्रमण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.