आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीच्या विरोधात काँग्रेसचा दिल्लीत जनआक्रोश मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली काँग्रेसने रविवारी नोटबंदीच्या निर्णयािविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि बँकेतून नोटा काढण्यासाठी लोकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.

जहांगीरपुरी येथे आंदोलकांना संबोधित करताना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक गोंधळ निर्माण झाला आहे. एका व्यक्तीने घेतलेल्या हुकूमशाही निर्णयामुळे अवघा देश संकटात सापडला आहे. नोटबंदीमागे मोठा घोटाळा आहे, असा आरोप करून माकन म्हणाले की, गरिबांनी केलेली बचत श्रीमंतांकडे हस्तांतरित करण्याचा हा कट आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील जनजीवन ठप्प झाले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करण्यात आली नाही. त्यामुळे लोकांना प्रचंड अडचणी सहन कराव्या लागत आहेत.

दिल्लीच्या सर्व ७० मतदारसंघांतील शहरी भाग तसेच अनधिकृत कॉलन्या, जेजे क्लस्टर आणि ग्रामीण भागात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. नोटबंदीच्या निर्णयाची सदोष अंमलबजावणी होत आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी पक्ष ‘नोट पे चर्चा’ या नावाने एक पुस्तिकाही काढणार आहे.
बातम्या आणखी आहेत...