आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

50 दिवस गरिबांसाठी विनाशक, ‘अर्थशास्त्रज्ञ’ डाॅ. सिंगांनी केंद्राला उभे केले पिंजऱ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरत असलेल्या विरोधी पक्षांच्या तर्कांना गुरुवारी भक्कम पाठबळ मिळाले. अर्थशास्त्रज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राज्यसभेत म्हणाले, मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय ही संघटित लूट, वैध चूक आणि व्यवस्थापनाचे अविस्मरणीय अपयश आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या जीडीपीमध्ये किमान २ टक्के घसरण होईल. डॉ. मनमोहनसिंग बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहिले. सामान्य माणसांच्या अडचणी आणि त्रास कमी व्हावा, असा काहीतरी मार्ग पंतप्रधानांनी काढला पाहिजे. ५० दिवसांचा कालावधी कमी असू शकतो. मात्र, गरीब आणि मागासवर्गाच्या लोकांसाठी तो विनाशकारक आहे. लोकांना आपलेच पैसे बँकेत जमा करण्याची सूट आहे, मात्र ते काढण्याची नाही, असा कोणता देश आहे? असा सवाल त्यांनी मोदींना केला.

पुढे वाचा, ज्यांच्या काळात सर्वाधिक काळा पैसा झाला तेच चिंतित : जेटली ...
बातम्या आणखी आहेत...