आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तयारीला वेळ मिळाला नाही\' वक्तव्यावरुन विरोधक आक्रमक, म्हणाले- PMनी माफी मागावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधकांनी एकजूट होऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. - Divya Marathi
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विरोधकांनी एकजूट होऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली - नोटंबदीवरुन संसदेतील गोंधळ काही थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळातच कामकाजाला सुरुवात झाली. वरिष्ठ सभागृहातील सदस्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर आक्षेप घेत, त्यांनी सभागृहात येऊन माफी मागण्याची मागणी केली. मोदींनी सकाळी एका कार्यक्रमात म्हटले होते, की जे लोक म्हणतात सरकारने पूर्ण तयारी केली नव्हती, वास्तविक त्यांचे दुखणे हे आहे की त्यांना तयारीला पूर्ण वेळ मिळाला नव्हता.
- शुक्रवारी सकाळी ११ वाजता राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विरोधकांनी एकसूरात पंतप्रधानांना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. आज सकाळी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांच्या आक्षेपावर टीका केली होती.

- काँग्रेसचे गुलाम नबी आझाद म्हणाले, 'पंतप्रधान मोदी असा आरोप कसा करु शकतात की विरोधकांना काळेधन लपवण्याला वेळ मिळाला नाही. हा विरोधीपक्षावरील गंभीर आरोप आहे. केवळ राज्यसभेतीलच विरोधीपक्ष नाही तर, लोकसभा आणि देशातील विविध विधानसभेतील विरोधीपक्षांवर हा आरोप आहे. हा देशाचा अपमान आहे. यासाठी पंतप्रधानांनी सभागृहात येऊन माफी मागितली पाहिजे.'
जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव म्हणाले, पंतप्रधानांनी विरोधीपक्षावर हा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे.

सभागृहात काय झाले
- पंतप्रधानांनी सभागृहात बोलले पाहिजे. पंतप्रधान सभागृहात असतील तेव्हाच चर्चा होऊ शकते. ते सभागृहात का येत नाही, असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला. पंतप्रधान आज पंजाब दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते सभागृहात आलेले नाहीत.

- बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनीही, पंतप्रधानांनी सभागृहात येऊन आज सकाळी केलेल्या वक्तव्याबद्दल माफीची मागणी केली. त्यासोबतच त्या म्हणाल्या, की त्यांनी हे देखिल स्पष्ट केले पाहिजे की कोणाकडे काळापैसा आहे.
- मायावतींच्या या विधानानंतर विरोधीबाकांवरील सर्व सदस्यांनी पंतप्रधानांच्या माफीची मागणी केली आणि गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी वाचा सविस्तर..
हे पण वाचा,
बातम्या आणखी आहेत...